केरळमध्ये एक मोठी घटना घडलीय. केरळमधील मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाल्याची घटना घडलीय. मुख्यमंत्र्यांचा ताफा तिरुवनंतपुरमच्या वामनपुरमच्या भागातून जात होता, त्यावेळी अपघात झाला. मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना एक स्कुटी चालवणारी एक महिला ताफ्याच्या पुढे आली आणि अचानकपणे टर्न घेतला. त्यामुळे ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्या.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या ताफ्याला गाड्यांची धडक बसल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक महिला स्कूटर चालवत होती. जी अचानक उजवीकडे वळली. त्यानंतर ताफ्यातील एका पांढऱ्या रंगाच्या एसयूव्ही कारच्या चालकाने ब्रेक लावला. त्यामुळे कार थांबली परंतु मागून येणाऱ्या कार एकमेकांवर आदळल्या.
ताफ्यातील पाच गाड्या आणि एक रुग्णवाहिका एकमेकांवर आदळल्या. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री विजनय हे कोट्टायमहून परतत होते. त्यावेळी हा अपघात झाला. दुर्घटना झाल्यानंतर सुरक्षा रक्षक कारमधून उतरत त्यांनी सर्व परिस्थिती हाताळली.
दरम्यान या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ताफा येत असतांना एक स्कुटीवाली महिला रस्त्याच्या अधोमध असताना उजव्या बाजुला वळते. कोणत्याच प्रकारचे इंडिकेशन न दाखवता त्या स्कुटी वळवू लागल्या. त्यामुळे ताफ्यातील कार एकमेकांवर आदळल्या. पोलिसांना अद्याप बाईक चालवल्या महिलेविषयी कोणतीच माहिती मिळाली नाही.
याआधी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील एका कारला ऑटोची धडक लागली होती. त्यामुळे एका 13 वर्षाच्या मुलासह 3 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा ताफा भोपाळहून शाजापूरला जात होता. तेथील सारंगपूरजवळ मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला ऑटोने धडक दिली. डीएम आणि एसपीही ताफ्यात प्रवास करत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.