Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: "बापरे… बाप!"बेडरुममध्ये आढळून आला ९ फूट लांब 'कोब्रा'; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप

Snake Viral Video: सोशल मीडियावर आपण दररोज अनेक व्हिडिओ पाहत असतो.मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका भल्यामोठ्या सापाचा आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दरदिवशी अनेक आश्चर्यात पाडणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. हेच व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडतो तर कधी अंगावर शाहारे येतात. मग हे व्हिडिओ कुठल्या हल्ल्याचे असो वा मग अपघातांचे असतील. मात्र सध्या सोशल मीडियावर एका भयंकर असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,ज्यात एका घरात भलामोठा साप आढळून आलेला आहे.

साप (Snake )किंवा असो लहानातला लहान प्राणी जरी आपल्याजवळ येताच अनेकांनी भिती वाटते. मात्र भलामोठाच किंग क्रोबाजर घरातील बेडरुममध्ये आढळला तर, घरातील सदस्यांची काय अवस्था होईल याचा तुम्ही विचार करा. अशीच एक घटना कर्नाटकातील अगुंबे या गावामधून समोर आली आहे. जिथे एका घरातील बेडरुममध्ये तब्बल ९ फूट लांबीहून अधिक मोठा किंग कोब्रा(Cobra) आढळून आलेला आहे.

व्हायरल(Viral) व्हिडिओत तुम्हाला घराच्या बाहेरुन एक व्यक्ती मोबाईलमध्ये सर्व व्हिडिओ काढताना दिसत आहे. जो घराच्या बाहेरुन चालत जाऊन घराच्या ज्या भागात साप आढळून आला आहे तिथं पर्यंत व्हिडिओ शूट केलेला आहे. त्यानंतर बेडरुमच्या पोटमाळ्यावर एक पेटी आहे, ज्यात सर्पमित्र जेव्हा ती पेटी उघडतो, त्यात एक भलामोठा किंग क्रोबा तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर सर्प मित्राने त्या पेटीमधला साप पकडून एका बॅगत भरताना व्हिडिओत(Video) दिसून येत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेला खुद्द सर्पमित्र याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला आहे आणि व्हिडिओच्या खाली भलामोठे कॅप्शन लिहिले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच ८ हजारांच्या घरात लाईक्स मिळाले असून मोठ्या प्रमाणात नेटकरी वर्गातून व्हिडिओल व्ह्यूज (Views)मिळत आहेत. व्हिडिओ पाहताच अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील पहिल्या यूजरने लिहिले आहे की,'ग्रेट जॉब', तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,'साप एवढ्यावर कसा आला' तर काहीनी आश्चर्यजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavtmal Crime : दोस्त दोस्त ना रहा! संतापलेल्या मित्रानेच जिवाभावाच्या मित्राची केली हत्या, यवतमाळ हादरले

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Riteish Deshmukh Video : छत्रपतींसमोर नतमस्तक! रितेश देशमुख सकाळी सकाळी पोहचला शिवनेरीवर, म्हणाला...

PM Kisan Yojana: होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹२०००; पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याबाबत अपडेट

Election : सरपंच थेट जनतेतूनच ठरणार! सोलापूरमधील ६५५ ग्रामपंचायतीचा धुरळा उडाला, पाहा वेळापात्रक

SCROLL FOR NEXT