Ganesh Chaturthi 2023 Saam TV
व्हायरल न्यूज

Ganpati Viral Video : बाप्पासाठी कायपण! 2 कोटी नोटा अन् 50 लाख नाण्यांनी सजलं गणपती मंदिर व्हिडीओ व्हायरल

2 Crore Note Ganpati Decoration: तुम्ही देखील घरच्या घरी फुलांपासून, चहाच्या कपापासून विविध डेकोरेशनचे साहित्य बनवले असेल.

Ruchika Jadhav

Bengaluru Ganesh Temple:

गणपती बाप्पा घरी आल्याने सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. बाप्पा घरी येणार म्हटल्यावर सजावट तर आलीच. आता बरेच जण इकोफ्रेंडली मूर्ती आणि सजावट करतात. बाजारात अनेक थर्माकॉलचे मखर उपलब्ध आहेत. मात्र व्यक्ती कागदाने बनवलेल्या मखरांना आणि डेकोरेशनच्या साहित्यांना खरेदी करतात. तुम्ही देखील घरच्या घरी फुलांपासून, चहाच्या कपापासून विविध डेकोरेशनचे साहित्य बनवले असेल. मात्र नोटांपासून डेकोरेशनचे साहित्य बनवल्याचे तुम्ही कधी ऐकले का? (Latest Marathi News)

कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळूरुमधील एका मंदिरात चलनी नोटांनी संपूर्ण मंदिर आणि मखर सजवण्यात आलं आहे. तब्बल दोन कोटी रुपयांच्या चलनी नोटा आणि नाणी यांनी बाप्पाचा मखर सजवण्यात आला आहे. मंदिरातील सजावट आणि डेकोरेशन चा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणतात. तो आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतो. त्यामुळे बाप्पासाठी काहीपण असं म्हणत मोठ्या श्रध्देने ही रोषणाई करण्यात आली आहे.

पुत्तेनहल्ली परिसरातील श्री सत्य गणपती मंदिर असे या मंदिराचे नाव आहे. मखर साजवण्यासाठी या मंदिरात 10, 20, 50 तसेच 100 आणि 200 रुपयांच्या नोटांचा वापर केला आहे. बऱ्याच ठिकाणी 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा देखील वापरण्यात आल्यात. @knowledge_marathi या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

ही सजावट करण्यासाठी 150 स्वयंसेवकांनी काम केले आहे. एवढ्या पैशांनी मंदिरात सजावट केल्याने कोणतीही अनपेक्षित घटना होऊनये यासाठी मंदिरावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांसह मंदिरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. मंदिर प्रशासन यातून सर्व भाविकांवर लक्ष ठेवून आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. भाविक नोटांचे डेकोरेशन पाहून अवाक झालेत. अनेक जण लांबून लांबून बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भारतातील पहिल्या टेस्ला शोरुमचं उद्घाटन

kitchen Tricks: भाजीला कट आणि गडद रंग हवा? मग हे खास स्वयंपाकघराचे ट्रिक्स वापरा

Head neck cancer signs: डोकं-मानेचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात होतात 5 मोठे बदल; सामान्य समजून 99% लोकं करतात दुर्लक्ष

Bollywood: प्रसिद्ध गायक अन् नेत्यावर भररस्त्यावर गोळीबार; चारचाकीवरून काढला पळ, नेमकं काय घडलं?

Aadesh Bandekar: आदेश बांदेकरांचं शिक्षण किती झालय? जाणून घ्या लाडक्या भावोजींचा प्रवास

SCROLL FOR NEXT