flood Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Junnar Viral Video: चोहीकडे पाणीच पाणी, मुसळधार पावसात पुराच्या भोवऱ्यात अडकला; तरूणाला वाचवतानाचा थरारक VIDEO व्हायरल

Junnar flood Viral Video: जुन्नरमध्ये पोखरी गावात एका नाल्याला पुर आला होता. या पुरात दुचाकीस्वार वाहून जात होता. पुरात अडकलेल्या दुचाकीस्वाराला स्थानिकांनी वाचवले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पुराच्या पाण्यात अनेक लोक पावसात अडकतात. जुन्नरमध्ये पारनेर तालुक्यात एका ओढ्याला पुर आला होता. या पुरात दुचाकीस्वार अडकला होता. या दुचाकीस्वाराला वाचवण्यात यश आसे आहे.

जुन्नरमधील पारनेर तालुक्यातील पोखरी गावात ही घटना घडली आहे. पोखरी गावात चांगलाच पाऊस पडला. या पावसामुळे पाथर्डी गावातील ओढ्याला पुर आला होता. या पुराचे पाणी पुलावरुन वाहत होते. याच पुलावरुन दुचाकी स्वार जात होता. पुराचे पाणी खूपच वेगाने वाहत होते. या पुराच्या पाण्यात दुचाकीस्वार दुचाकीसह वाहून गेला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. पुलावरुन वाहून जात असताना स्थानिक लोकांनी त्याला मदत केली. या व्यक्तीला वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे.

दुचाकीस्वार पुराच्या पाण्यात वाहून जात असताना स्थानिक लोकांनी प्रसंगावधन दाखवले. दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी स्थानिक लोकांनी साखळी केली. स्थानिक लोकांनी साखळी करुन त्या तरुणाचा जीव वाचवला आहे. यामुळेच धोकादायक पाण्यातून प्रवास करणे टाळावे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या घटनेचा थरारक व्हिडिओ कॅमेरात कैद करण्यात आला आहे. व्हिडिओत दुचाकीस्वार पुराच्या पाण्यात अडकलेला दिसत आहे. दुचाकीस्वारासोबत त्याची बाईकदेखील तिथेच खाली पडलेली दिसत आहे. दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी स्थानिक लोक तिथे जमा झाले आहे. स्थानिक लोक त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

राज्यात अनेक भागात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेकठिकाणी नदी, नाल्यांना पुर आले आहे. काल परभणीतदेखील नाल्याच्या पुरात एक दोन महिला वाहून गेल्याची घटना घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

बनावट CBI चा मुंबई पोलिसांकडून भांडाफोड; सराफा व्यावसायिकांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर अन्...

Panner Chilli Recipe: घरच्या घरी बनवा स्ट्रीट फूडस्टाईल टेस्टी पनीर चिली, वाचा सोपी रेसिपी

Rain Alert : राज्यावर अल निनोचं संकट! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रायगड, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT