Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video :वाह रे पठ्या! मुंबईच्या लोकल प्रवाशाचा मोबाईल ठेवण्यासाठी अनोखा जुगाड; VIDEO पाहा

Mumbai Local Train Video : अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर मुंबईच्या लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यात कधी स्टंटबाजीचे व्हिडिओ असतात तर कधी हाणामारीचे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेनचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. याच लोकल ट्रेनमध्ये अनेक प्रवासी स्वता:चा जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसतात. या संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातच पुन्हा एकदा सोशल मीडियावर मुंबईच्या लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या डोक्याला नक्कीच हात लावाल.

लोकल ट्रेनमधून दररोज प्रवास करणं म्हणजे हे अतिशय कठीण काम असते. जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात सामान असेल तर,या सामाना सोबत गर्दीतून प्रवास करण्यात अतिशय अवघड होते. लोकल ट्रेनच्या (Train)या गर्दीत अनेकांना आपला मोबाईलही पकडता येत नाही, मात्र या लोकल दरवाजात उभ्या असलेल्या व्यक्तीने खचाखच भरलेल्या लोकलच्या गर्दीत मोबाईल ठेवण्यासाठी अनोखा जुगाड वापरला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मुंबईच्या लोकल(Local) ट्रेनचा दिसून येत आहे. लोकल ट्रेन एका स्टेशनवर थांबलेली आहे. ट्रेनच्या बाजूचा संपूर्ण परिसर प्रवाशांनी भरलेला आहे. शिवाय या लोकल ट्रेनच्या आतमध्येही मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. जर तुम्ही नीट पाहिले तर एक व्यक्ती ट्रेनच्या दरवाजावर उभा राहून हेडफोन लावून गाणी ऐकत आहे.मात्र या व्यक्तीने गाणी ऐकताना त्याचा फोन त्याच्याकडे न ठेवता. चक्क दरवाज्याच्यावर काहीतरी जुगाड करुन अडकवला आहे.

सध्या हा व्हिडिओ(Video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @bandrabuzz या अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की, 'या देशात अशा व्यक्तींची कमी नाही'. अशा अनेक गंमतीदार प्रतिक्रिया आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये विराज प्रोफाइल कंपनीविरोधात आदिवासींचं बेमुदत धरणे आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

SBI Data Leak : SBI च्या खातेधारकांना मोठा धक्का, नाव, नंबर अन् पत्ता... ग्राहकांची संपूर्ण माहिती डार्क वेबवर लीक

Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT