Missile strikes intensify in Tehran amid growing speculation over Ayatollah Ali Khamenei’s status Saam Tv
व्हायरल न्यूज

अयातुल्ला खामेनीई जिवंत? खामेनीई सुखरुप असल्याचा दावा

Fact Check: आम्ही व्हायरल व्हिडिओंची पडताळणी करतो आणि सत्यता समोर आणतो...आता इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी जिवंत असल्याचा दावा करण्यात आलाय...खरंच इस्त्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात खामेनींचा मृत्यू झालेला नाही का...? या दाव्याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ल खामेनी जिवंत असल्याचा दावा केलाय...होय, या व्हिडिओतील व्यक्तीने खामेनी जिवंत असल्याचा दावा केलाय...यावेळी त्याने इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचं विधान ऐकवलंय...तेही खामेनी सुखरुप असल्याचं सांगतायत...पण, खरंच खामेनी जिवंत आहेत का...? मग त्यांचा हल्ल्यात मृत्यू झाल्याची बातमी कुठून आली...?

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनीच खामेनी जिवंत असल्याची माहिती दिली असा दावा या व्हिडिओत करण्यात आलाय...इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल जोरदार हल्ले करतंय...अमेरिका आणि इस्त्रायलने तेहरानवर हल्ला केला त्यात फक्त 2 कमांडरचा मृत्यू झाल्याचा दावा केलाय...तर खामेनी सुरक्षित असून, सर्व ऑफिसर्सही जिवंत असल्याचा दावा केल्यानं खळबळ उडालीय...खामेनींचा मृत्यू झाल्याने अनेक देशात निदर्शनं काढण्यात आली...इराणच्या समर्थनार्थ आंदोलनं करण्यात आली...त्यामुळे याची सत्य माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही काही माहिती मिळवली..त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचा मृत्यू झाला

खामेनींचा मृत्यू झाल्यामुळेच उत्तराधिकारी निवडला

मोजतबा खामेनींची इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड

88 वरिष्ठ मौलवींच्या असेंबली ऑफ एक्सपर्ट्सचा निर्णय

इराणमध्ये अयातुल्ला अली खामेनीच्या दफनविधीची तयारी सुरू करण्यात आलीय...सुपुर्द ए खाक हा सोहळा आहे...त्यापूर्वी तेहरानमधील इमाम खामेनी दर्ग्यात खामेनींना श्रद्धांजली अर्पण केली जाणाराय...त्यामुळे आमच्या पडताळणीत खामेनी जिवंत असल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

'वेलकम टू हेल' इराणचा अमेरिकेला इशारा, इराणची धमकी, जगाला धडकी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

SCROLL FOR NEXT