London Street Viral Video SAAM TV
व्हायरल न्यूज

London Street Viral Video: लंडनमधील रस्त्यावर तरुणानं गायलं ९०च्या दशकातील प्रसिद्ध गाणं; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

London Street Viral Video: तरुणाचा गाणं गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

Viral Video News: बॉलिवूडच्या गाण्यांची भुरळ परदेशातही पाहायला मिळत आहे. भारतीय व्यक्ती जगात कुठेही गेला तरी मायदेशातील गाणे विसरत नाही. याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. लंडनमध्ये भारतीय तरुणाने एक सुंदर हिंदी गाणं गायलं आहे. या तरुणाचा गाणं गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

तरुणाने लंडनमध्ये रस्त्यावर बसून 'पहला नशा, पहला खुमार' हे गाणं गायलं आहे. हे गाणं नव्वदच्या काळातील खूपच प्रसिद्ध गाणं आहे. 'पहला नशा, पहला खुमार' या गाण्याचे मूळ गायक उदीत नारायण आणि साधना सरगम आहेत. 'जो जीता वही सिंकदर' या सिनेमातील हे गाणं आहे. नव्वदच्या काळातील हे गाणं आजही प्रचंड गाजताना दिसत आहे.

तरुणाने लंडनमधील रस्त्यावर म्युझिक सिस्टिम घेऊन हे गाणं गायलं आहे. या तरुणाने गायलेलं गाणं नेटकऱ्यांना प्रचंड आवडलं आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. इन्स्टाग्रामवर 'विश' या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे गाणं शेअर करण्यात आले आहे.

तरुणाच्या गाण्याला सुंदर आवाजाला आतापर्यंत अनेक जणांनी दाद दिली आहे. सोशल मीडियावर आतापर्यंत लाखो जणांनी गाण्याचा व्हिडिओ पाहिला आहे. लंडन आणि भारतातील नेटकऱ्यांनाही हा व्हायरल व्हिडिओ भावला आहे.

या तरुणाने लंडनमधील 'ऑक्सफोर्ड स्ट्रीट' या ठिकाणी गाण्याचं सादरीकरण केलं आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, 'तू खूपचं सुंदर गाणं गायलं आहे. अफलातून आवाज आहे'. सोशल मीडियावरील युजरने या तरुणाच्या आवाजाचं कौतुक केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अमेरिकेच्या दबावामुळे द्यावा लागला - शेतकरी नेते -राकेश टिकैत

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT