iit kanpur students started fight in kabaddi match after dispute thrown out chairs on each other watch video  Twitter
व्हायरल न्यूज

Fight In Kabaddi: कबड्डीचं मैदान बनलं कुस्तीचा आखाडा; खेळाडूंनी लाथा -बुक्क्यांनी तुडवत एकमेकांवर फेकल्या खुर्च्या, VIDEO

Kabaddi Viral Video : कबड्डीच्या मैदानावर जोरदार हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

Fight In Kabaddi Match:

कानपुरच्या आयआयटी परिसरात कबड्डीचं मैदान कुस्तीचं आखाडा बनल्याचं पाहायला मिळालं आहे. या सामन्यात झालेला वाद इतका वाढला की, खेळाडू एकमेकांसोबत भिडले. लाथा- बुक्क्यांनी मारहाण करण्यासह खेळाडूंनी एकमेकांवर खुर्च्या मारून फेकायला सुरूवात केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कबड्डीचं मैदान बनलं कुस्तीचा आखाडा..

हा वाद शनिवारी (७ ऑक्टोबर) झाल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. आयआयटी प्रशासनाकडून याबाबत कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही. (Latest sports updates)

वार्षिक स्पर्धेसाठी ४५० महाविद्यालयातील २५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. शनिवारी कबड्डीचा सामना सुभाष युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी नवी दिल्ली आणि वायएमसीए फरिदाबाद या दोन्ही संघांमध्ये रंगला. या सामन्यासाठी प्रेक्षकांसह जज आणि कोच देखील उपस्थित होते.

नेमकं काय घडलं?

सामना सुरू असताना दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीला वादाचं स्वरूप मिळताच दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये तुफान हाणामारी झाली. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की, खेळाडू एकमेकांवर खुर्च्या फेकताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सोशल मीडियावर अपलोड होताच, जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT