Chai Making Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video:चक्क भाजलेल्या चहा पावडरचा चहा ?फक्कडChai व्हिडिओ एकदा पहाच

Chai Making Viral Video:आपल्या प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात ही कडक अशा चहाने होते.अशातच आता एका चहाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुम्ही म्हणाल नुसत्या चहामध्ये काय वेगळ आहे? या व्हिडिओत भाजलेल्या चहा पावडरचा चहा बनवला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Roasted Tea Viral Video

सोशल मीडिया हा विविध प्रकारच्या व्हायरल व्हिडिओचा एक खजिना आहे. यात कधी स्टंटचे व्हिडिओ तर कधी हाणामारीचे व्हायरल व्हिडिओ असतात. यातील व्हायरल व्हिडिओचे अनुकरण करायचा अनेकजण प्रयत्न करतात.

तसंच विविध पद्धतीच्या पदार्थांचे व्हिडिओ देखील असतात,यातील खास गोष्ट म्हणजे अनेक वेळा साधा-सुधा पदार्थही आगळ्यावेगळ्या पद्धतीने तयार केला जातो अन् तो व्हायरल होतो. अशातच आता एका चहाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुम्ही म्हणाल नुसत्या चहामध्ये काय वेगळ आहे? या व्हिडिओत भाजलेल्या चहा पावडरचा चहा बनवला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आपल्या प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात ही कडक अशा चहाने होते. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडितील चहा कसा तयार केला जातोय ते पाहुयात.. सुरुवातीला, एका काळ्या रगांच्या भांड्यात थोड्या प्रमाणात चहा पावडर आणि साखर भाजून घेतली जाते. मग या भाजलेल्या चहा पावडर आणि साखरेच्या मिश्रणात वेलची आणि थोडं पाणी मिक्स केल जातं. मग ते नीट भाजल्यानंतर त्यामध्ये योग्य प्रमाणात दूध मिस्क करतात त्यानंतर चहा उकळ्यासाठी त्या भांड्यावर काचेच झाकण ठेवले जाते. चहा तयार झाल्यानंतर दोन लहान काचेच्या क्लासमध्ये पिण्यासाठी काढला जातो.

बनवलेल्या रोस्टेड टी चा व्हिडिओ @jasujaया एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे. बाजारात विविध प्रकारच्या चहा पाहायला मिळतात. अगदी टपरीवरच्या कटींग चहापासून घरच्या चहापर्यंच चहा बनवण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. कधी बटर चहा तयार केला जातो तर कधी मोमोज चहा बनवला जातो.

व्हायरल झालेला व्हिडिओ हा आतापर्यंत ३ लाख नेटकऱ्यांनी पाहिला आहे. तसंच या व्हिडिओतील काही यूजर्संना ही रोस्टेड टी आवडलेली आहे तर काहींनी या व्हिडिओ आवडला आहे. या चहाचा व्हिडिओ नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT