Viral Video: उत्तरप्रदेशच्या पिलीभीत जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. सुनगढी पोलिस स्टेशन परिसरात मालवाहू ट्रकची कारला जोरात धडक बसली आहे. यामुळे कार ट्रकखाली पूर्णपणे चिरडली आहे. सुदैवाने या अपघात कोणतीही जिवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पिलीभीत जिल्ह्यातील सुनगढी पोलिश स्टेशन परिसरात राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. गवताने भरलेला एका ट्रकचा अचानक तोल गेला आणि तो रस्त्यावर पार्क केलेल्या कारवर उलटला. ट्रक कारवरती पडल्याने कारचा चक्काचूर झाला. सुदैवाने, आत असलेले कुटुंब - दोन मुले आणि दोन तरुण - काही सेकंदांपूर्वीच कारमधून बाहेर पडले होते. यामुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही. कार ट्रकखाली पूर्णपणे चिरडली गेली, परंतु सर्वजण सुरक्षित बचावले आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लाल रंगाची कार पार्क केली आहे. दरम्यान कारमधून व्यक्ती बाहेर येताना दिसत आहे. तीन व्यक्ती बाहेर आल्यानंतर अचानक मालवाहू ट्रक पलटताना दिसतो आहे. ट्रकने एकाचबाजूला पूर्ण झोक दिला असून कार चिरडली आहे. कारमधून सर्व व्यक्ती बाहेर पडल्यामुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही.
राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या अनेक घटना घडत असतात. सातत्याने या ठिकाणी जड वाहनांचे ट्रक येत- जात असतात. यामुळे वाहन चालवताना काळजी घेणे महत्वाचे आहे. धोकादायक वळण, स्पीड यामुळे देखील मोठे अपघात होतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.