Snake Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Snake Viral Video: बापरे! लहान बाळाजवळ साप आणि मुंगसाची फायटिंग, शेवट पाहून अंगावर काटा येईल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर आतापर्यंत अनेक सापांचे थरारक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या सापांच्या व्हिडिओला पाहून प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो. आजही सोशल मीडियावर एक सांपाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्यापैंकी कोणीही साप किंवा भल्या मोठ्या अजगराचे नाव जरी ऐकलं तर प्रत्येकाचा थरकाप उडतो. लांबून जरी साप दिसला तरी भिती वाटते. पण जर हाच तुमच्या बाळाच्या पाळण्याजवळ दिसला तर? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात एका बाळाच्या पाळण्याजवळ भला मोठा साप आहे.

सोशल मीडियावर म्हणजे विविध व्हिडिओचा खजिना आहे. यावर दररोज असंख्य व्हिडिओ (Video) व्हायरल होत असतात. कधी गंमतीदार तर कधी थरारक अपघांताचे. सोशल मीडियावर याआधीही अनेक सांपाचे भितीदायक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, त्यात साप कधी लोकांच्या घरात आढळून आला आहे तर कधी चक्क हेल्मेटमध्ये. मात्र सोशल मीडियावर सध्या सापाच्या या व्हायरल व्हिडिओने प्रत्येकाला हादरुन टाकले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, सुरुवातील मुंगूस सापाला पकडण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र तिथे उपस्थित असलेल्या लोकांना घाबरुन मुंगूस तेथून पळून जातो. त्यानंतर भला मोठा साप (snake)कठड्यावर चढून वर जातो आणि जवळच असलेल्या बाळाच्या झोळीवर चढतो. आपल्याला व्हिडिओ सापाला तेथून पळवून लावण्यासाठी काही व्यक्ती प्रयत्न करताना दिसत आहेत. आजूबाजूला शेत असल्याने साप तिथे आला आहे असे व्हिडिओ पाहून समजते मात्र सुदैवाने झोळीत बाळ नव्हते.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावरील @umeshshahane72 या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे. पंरतू व्हायरल व्हिडिओ कुठला आहे हे समजले नाही. आतापर्यंत अनेक नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओ पाहताच मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या आहेत,त्यातील एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,' नशीब वाळ त्या पाळण्यात नव्हता' तर दूसऱ्या यूजरने लिहिले आहे की,' तुमचं काम मुंगसानेच केलं असतं त्यालाच पळवुन लावलं तुम्ही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT