Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बसमध्ये घडला भयानक प्रकार! खिडकीत बसणं आलं व्यक्तीच्या अंगलट; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

CCTV Viral Video : सोशल मीडियावर कायम अनेक सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ व्हायरल झाले आहे.मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ अंगाचा थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हायरल व्हिडिओ पाहून आपण भावूक तर होतो किंवा आश्चर्यचकित तर होतो.सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.जो पाहून अंगावर काटे उभे राहतात.

सोशल मीडियावर ट्रेन (Train)प्रवास असो किंवा विविध मार्गाचे प्रवास,या संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. जर ट्रेनचा प्रवास असेल तर अनेक हाणामारीचे व्हिडिओ पाहायला मिळतात तर बसचा प्रवास असल्यास तोही महिलांच्या हाणामारीचा असतो तर कधी तूफान गर्दीचा.मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका बसमधील आहे.ज्यात बसच्या खिडकीत बसणे एका व्यक्तीला महागात पडलेले आहे. सध्या हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) व्हिडिओ तुम्हाला धावती बस दिसून येत आहे. या बसमध्ये एका खिडकीच्या बाजूला असलेल्या विडोंसीटवर एक व्यक्ती बसलेला आहे. तुम्ही त्या व्यक्तीकडे नीट पाहिले असता,त्या व्यक्तीचा एक हात खिडकीच्या काहीसा बाहेर आहे.मात्र काही वेळात खिडकीच्या बाहेर असलेल्या कोणत्यातरी एका वस्तूला जोरात धक्का लागून त्या व्यक्तीच्या हाताला गंभीर दुखापत होताना व्हिडिओत दिसत आहे. निष्काळजीपणा व्यक्तीच्या अंगलट आलेला दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Video )सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @SecB4_Blunder या अकाउटवर शेअर करण्यात आलेला असून व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे.संपूर्ण प्रकार हा बसच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे.मात्र हा व्हिडिओ कुठला आणि कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gokul Election: 'गोकुळ'चं राजकारण तापलं, भाजप अन् महाडिक गटाला डावलणं सत्ताधाऱ्यांच्या अंगलट?

परिणिती चोप्राचा नवरा राघव चढ्ढा भाजपमध्ये प्रवेश करणार? माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Maharashtra Live News Update : जळगावात एटीएम मशीन चोरीला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Skin Care Summer: उन्हाच्या कडाक्यात चेहऱ्याला लावू नका या गोष्टी, डॉक्टरांनी दिल्या टिप्स

Kalyan : कल्याणमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, डॉक्टरचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT