Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: थरारक! गाडी पुढे जात असतानाच अचानक डोंगर कोसळला; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

Landslide Viral Video: सोशल मीडियावर वारंवार अनेक धक्कादायक घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.कधी थरारक अपघात असतात तर काही घटना अशा असतात त्या पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडतो.

Tanvi Pol

Himachal Pradesh Video: हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस आणि बर्फवृ्ष्टी सुरु आहे.त्यामुळे सातत्याने तिथे डोंगरावरुन दरड कोसळत आहेत.त्यातच सध्या कुल्लू जिल्ह्याकील एका भागतही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे,जिथे एक कार चालक थोडक्यात बचावला गेला आहे.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अंगावर काटा आणणारी घटना कॅमेऱ्यात!

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत(Viral) तुम्हाला एक परिसर दिसत असून तिथे जोरदार पाऊस सुरु आहे.अशा या पावसात एक कार चालक डोंगराच्या बाजूने जात असतो.मात्र त्यावेळी डोंगरावरुन अचानक दरड कोसळते.कार चालकाने ब्रेक लावल्याने थोडक्यात त्याचा जीव बचावला गेला आहे.सर्व खरारक घटना तेथिलच एका पर्यटकाच्या कॅमेऱ्याक कैद झाली असून हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.

'livetimestvhimachal' या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड करण्यासोबत ''सरवारीजवळ टेकडी कोसळली, वाहन स्वार थोडक्यात बचावला''असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.व्हिडिओला लोकांनी हजारो लाईक्स आणि लाखोंच्या संख्येने या धक्कादायक(Shocking) घटनेच्या व्हिडिओला लाईक्स मिळाले आहेत.शिवाय या प्रसंगानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.

एका यूजरने व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट केली,''वेळ सर्वात शक्तिशाली आहे'' ,दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''ड्रायव्हरचा आत्मा थरथरला असेल''तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''जर ड्रायव्हरने ब्रेक लावला नाही तर तो सरळ वर गेला असता'' तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माणगाव, इंदापूर बायपास 1 जूनपर्यंत सुरू होणार

IAS Transferred: सात वरिष्ठ IAS आणि PCS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; राज्यातील प्रशासनात मोठा फेरबदल

Nauvari Saree Blouse Patterns: नऊवारी साडीवर उठून दिसतील हे 8 ट्रेंडिंग ब्लाउज पॅटर्न; गुढीपाडव्याला तुमच्यावर खिळतील लोकांच्या नजरा

Coconut Water: गोड पाणी असणारा नारळ कसा ओळखायचा? वाचा १ सोपी ट्रिक

Saturday Horoscope : शब्द खरा ठरणार, आर्थिक फायदा होणार; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

SCROLL FOR NEXT