Health Tips  
व्हायरल न्यूज

Health Tips : तुमच्या मीठ-साखरेत प्लास्टिक; संशोधनात धक्कादायक माहिती समोर

Health Tips : आता तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी. तुम्ही रोज विविध पदार्थांच्या माध्यमातून खात असलेल्या मिठात आणि साखरेत प्लास्टिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. म्हणजे तुमच्या पोटात रोज प्लास्टिक जातंय. हे कशामुळे होतंय? यामुळे काय दुष्परिणाम होणार? कुणाच्या संशोधनातून ही धक्कादायक माहिती समोर आलीय? पाहूयात हा विशेष रिपोर्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्वेता भालेराव, साम प्रिनिधी

मीठ-साखरेशिवाय तुमचा-आमचा दिवस जात नाही.साखरेशिवाय चहा नाही.आणि गोड पदार्थही नाहीत...तर मिठाशिवाय तर कोणताही खाद्यपर्दाथ केवळ अशक्य. आता तुमच्या मनात विचार आला यात काय नवीन आहे. हे सारं तर जगजाहीर आहे. पण थांबा , कारण तुम्ही खात असलेल्या मीठ आणि साखरेत प्लास्टिक आहे.

हे ऐकून तुम्हाला धक्का बसला ना...तुम्ही बरोबर ऐकलंय.तुमच्या मिठात आणि साखरेत प्लास्टिक आहे. मग तुम्ही देशातल्या कोणत्याही कंपनीचं किंवा ब्रॅण्डचं मीठ खात असाल तरी ते प्लास्टिकमुक्त नाही. आणि याला साखरही अपवाद नाही..म्हणजे तुच्या पोटाल रोज प्लास्टिक जातंय...आणि हा दावा आम्ही नव्हे तर दिल्लीतल्या टॉक्सिक लिंक या संस्थेच्या संशोधनात ही धक्कादायक माहिती समोर आलीय. या संस्थेनं टेबल, मीठ, रॉक मीठ, समुद्री मीठ आणि स्थानिक कच्च्या मिठासह 10 प्रकारांच्या मिठाचं संशोधन केलं. त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत..त्या पाहूयात..

तुमच्या मीठ-साखरेत प्लास्टिक

मीठ-साखरेवर टॉक्सिक लिंक संस्थेचं संशोधन

मीठ आणि साखरेच्या नमुन्यांत मायक्रोप्लास्टिक

फायबर, पेलेट्स, फिल्म्स आणि तुकड्यांसह विविध स्वरूपात प्लास्टिक

या मायक्रोप्लास्टिकचा आकार 0.1 मिलिमीटर ते 5 मिमी.

आयोडिनयुक्त मिठात मायक्रोप्लास्टिकचे सर्वाधिक प्रमाण

मिठात 6.71 ते 89.15 तुकडे प्रति किलो मायक्रोप्लास्टिक

साखरेत 11.85 ते 68.25 तुकडे प्रति किलो मायक्रोप्लास्टिक

ऑरगॅनिक मिठात प्लास्टिक कमी

या मायक्रोप्लास्टिकचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे यावर संशोधन करण्यात आलं. यासाठी संशोधकांनी मीठ आणि साखरेचे विविध नमुने तपासले. यात ही धक्कादायक माहिती समोर आलीय. या मायक्रोप्लास्टिकचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे यावर संशोधन करण्यात आलं. यासाठी संशोधकांनी मीठ आणि साखरेचे विविध नमुने तपासले. यात ही धक्कादायक माहिती समोर आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT