कोल्ड-प्लेच्या कॉन्सर्टमधील ते कपल तुम्हाला आठवतं का? अमेरिकेची AI कंपनी एस्ट्रोनॉमरचे सीईओ एंडी बायरन (Andy Byron) आणि त्याच कंपनीची एचआर हेड क्रिस्टिन कॅबोट (Kristin Cabot) यांना अचानक लाईव्ह शो दरम्यान कॅमेराने टिपलं. यामुळे त्यांचं अफेअर समोर आलं आणि सर्वजण हैराण झाले. असंच एक प्रकरण आता समोर आलं आहे.
एका फुटबॉलच्या सामन्यादरम्यान एक व्यक्ती त्याच्या ऑफिसमधील मैत्रिणीसोबत लपून सामना बघायला गेले होते. मात्र स्टेडियमच्या मोठ्या स्क्रीनवर ते स्पॉट झाले आणि त्यांचा संपूर्ण खेळच बिघडला. हजारो प्रेक्षकांसमोर त्याचं एक सिक्रेट समोर आलंय.
मॅच कोणतीही असो सामना पाहायला आलेल्या प्रत्येकाला वाटत असतं की, आपण कॅमेरावर दिसावं. फुटबॉलचा सामना सुरु असताना कॅमेरामॅनने या कपलकडे कॅमेरा फिरवला आणि क्षणार्धात त्यांना धक्का बसला. ही महिला तिच्या मित्राच्या मांडीवर बसली होती. ज्यावेळी त्यांच्याकडे कॅमेरा गेला तेव्हा ती महिला उठून पळून गेली. तर तिचा मित्र समोरच्या खुर्चीच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत होता. त्यांची उडालेली धांदल पाहून आजूबाजूला बसणाऱ्या लोकांना हसू आवरेना.
या कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर लोकांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. यावेळी एका युझरने म्हटलंय की, घरी जाऊन हा व्यक्ती काय उत्तर देईल. तर दुसऱ्या एका युझरने मस्करीमध्ये म्हटलंय की, यांचा तर शेवटी खरा गेम यांचाच झाला.
भले ही घटना अनेकांनी हसण्यावारी घेतली असेल, मात्र हा प्रश्न फार गंभीर आहे. आजकाल स्टेडियममध्ये हाय-डेफिनेशन कॅमेरे असतात. हे कॅमेरे प्रेक्षकांच्या प्रत्येक छोट्या गोष्टी टिपत असतात. सामन्याचं प्रसारण संपूर्ण जगभरात होतं. अशातच एक छोटी चूक लोकांचं संपूर्ण आयुष्य बर्बाद करू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.