सध्या देशभरात ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आता कुमारांनी राजीनामा दिल्याचा दावा करण्यात आलाय...ज्ञानेश कुमारांंनी राष्ट्रपतींकडे राजीनाम्याचं पत्र पाठवल्याचा दावा केल्याने खळबळ उडालीय...SIR प्रक्रियेसंदर्भात आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायत...पण, व्हायरल होत असलेलं पत्र खरं आहे का...? या पत्रात काय दावा केलाय पाहुयात...
हा निर्णय काळजीपूर्वक घेण्यात आला. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल देशाच्या नागरिकांचे आभार मानतो. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची सेवा करण्याची आणि निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य आणि निष्पक्षता टिकवून ठेवण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी सन्मान आहे.
विशेष म्हणजे, या पत्रावर मुख्य निवडणूक आयुक्तांची सही आहे...त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उद्देशून पत्रं लिहिलंय...पण, खरंच ज्ञानेश कुमारांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवलाय का...? SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयुक्तांमध्ये मतभेद असल्याचा दावा करण्यात आला होता...ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली...
तसेच 13 कोटी लोकांची मतदार याद्यांमधून नावं वगळल्यावरून विरोधक आक्रमक झालेयत...देशभरात ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी मोर्चे काढले जातायत...विरोधकांनी राजीनाम्यासह कारवाईचीही मागणी केलीय...त्यातच आता हे पत्र समोर आल्याने खरंच त्यांनी राजीनामा दिलाय का...? याची आम्ही पडताळणी केली...याबाबत आम्ही अधिकृत माहिती सरकारकडून मिळवण्याचा प्रयत्न केला...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिलेला नाही
कुमारांच्या नावाने व्हायरल झालेले पत्र बनावट
विरोधकांनी कुमारांच्या राजीनाम्याची मागणी केलीय
अजूनही ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिलेला नाही
निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्यांनी या दाव्याचं खंडन केलंय...जनतेनं अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आलंय...सध्या देशभरात ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय...त्यामुळे हे पत्र व्हायरल करण्यात आलंय...मात्र, आमच्या पडताळणीत मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिल्याचा दावा असत्य ठरलाय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.