दोन दिवसांपूर्वी संपूर्ण देशात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. प्रत्येक शहरात गावागवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आला होता. असाच एक कार्यक्रमत गुजरातमधील भुजमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात देशभक्तीवर गीते सादर केली जात होती. मात्र कोणाला माहिती की इतक्या सुंदर कार्यक्रमात विघ्नही येऊ घातलं आहे.
भुजमध्ये एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. महिला एका कार्यक्रमात देशभक्तीवर गीत सादर करताना सादर करत असताना तिला हृदयविकाराचा झटका आला आणि जमिनीवर कोसळली. यातच तिचा मृत्यू झाला आहे. कार्यक्रमात उपस्थित लोकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भुज येथील प्रमुच्छस्वामीनगरमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षमित्र संस्थेने कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मंचावरील खुर्चीवर बसून महिला देशभक्तीपर गीत सादर करत होती. यावेळी तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ती खुर्चीवरून जमिनीवर कोसळली. तेथे उपस्थित लोकांनी महिलेला रुग्णालयात नेले, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
आरती बेन राठोड असं मृत महिलेचे नाव आहे. कार्यक्रमात उपस्थित लोक महिला गीत सादर करत असतानाचा व्हिडिओ शूट करत असताना ही घटना घडली आहे. त्यामुळे महिलेला ह्रदयविकाराचा झटका आला तो क्षण या व्हिडओत कैद झाला आहे. कोणतरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला असून प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान या घटनेमुळे सर्वस्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की अलिकडच्या वर्षांत, विशेषत: कोविड-19 महामारीनंतर लोकांमध्ये हृदयाच्या समस्या वाढल्या आहेत. शारीरिक हालचालींचा अभाव, तणाव, नैराश्य, खाण्याच्या चुकीच्या सवयी ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जाते. 2023 च्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की हृदयविकाराच्या घटनांमध्ये केवळ भारतातच नाही तर जगातील इतर अनेक देशांमध्येही वाढ झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.