Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: लाडक्या नातवाच्या लग्नात आजीचा जलवा! वयाचे बंधन झुगारुन केला डान्स; VIDEO होतोय व्हायरल

Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका आजींचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या आजींनी त्यांच्या नातवाच्या लग्नात धमाकेदार डान्स केलेला आहे. व्हिडिओ होत आहे तुफान व्हायरल.

Tanvi Pol

Old Women Dance: सोशल मीडियावर तुम्हाला प्रत्येकवेळी अनेक डान्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. डान्स व्हिडिओ अनेकदा लहान मुलांचे असतात तर कधी लग्नातील कपल्सचे मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका आजींबाईचा आहे, ज्यात त्यांनी लाडक्या नातवाच्या लग्नात छान डान्स केलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला लग्नाचा हॉल दिसत आहे. या हॉलमध्ये अनेक नातेवाईक मंडळी आलेले दिसत आहे, अशातच सुरु असलेल्या कार्यक्रमात सर्वजण डान्स(Dance) करु लागतात मात्र त्याती काही महिला नवऱ्या मुलाच्या आजीला तिथे आणतात आणि गाण्यावर डान्स करण्यास सांगतात, मात्र आजींना जरा लाजत असल्याने एक महिला आजींचा हात पकडून डान्स करु लागते. सध्या या आजींचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या पसंतील येत आहे.

आजींचा डान्स व्हिडिओ ''makeupartist_pooja_09 आणि poorushi22'' अशा दोन इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर ,''हौसेला मोल नाही तस हौसेला वय नाही...'', असे कॅप्शन लिहिण्यात आलेले आहे. डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवर १ दिवसापूर्वी पोस्ट केल्यानंतर अनेक हजारो नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक्स केलेले आहे तर दर मिनिटाला व्ह्यूज संख्या वाढत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील काही यूजर्संनी म्हटले आहे की,'' खरंच खूप भारी वाटल व्हिडिओ पाहून'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''मला हा व्हायरल व्हिडिओ आवडला'', तर अनेकांनी हार्टचे इमोजी कमेटबॉक्समध्ये दिलेले आहे.

टीप : लग्नातील आजींनी केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओची याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळी अन् छठपूजेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात 'या' ठिकाणांहून सुटणार १७०२ विशेष गाड्या

Firecracker Safety Guide: फटाके फोडताना काळजी घ्या! डॉ. अनुपम टाकळकर यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना|VIDEO

Maharashtra Live News Update: सुरतच्या उधना रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग

Viral Fever: दिवाळीनंतर वायरल तापाचा धोका वाढतो? जाणून घ्या कारण

Raigad Crime: सोशल मीडियावरच्या प्रेमासाठी तोडली सात वचनं; प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने काढला पतीचा काटा

SCROLL FOR NEXT