Viral Video : 'यमराज कोण आहे?'; महिलेने ट्रॅफिक पोलिसांपासून वाचण्यासाठी केली 'शिनचॅन'ची नक्कल, पहा व्हिडीओ

Viral Video : हरियाणातील वाहातूक नियम मोडलेल्या एका मुलीचा खोडकर व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये वाहातूक पोलिसासोबत न भांडता ती त्यांच्यासोबत मस्करी करत असल्याने तिचे कौतूक होत आहे.
Viral video
Viral videoInstagram
Published On

Viral Video : हरियाणातील रोहतक येथील एका विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका तरुणीने अनेक वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर एका वाहतूक पोलिसाला चुकवण्यासाठी लोकप्रिय कार्टून पात्र शिनचॅन नोहाराची नक्कल केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायर होत आहे.

हेल्मेटशिवाय, रस्त्याच्या चुकीच्या बाजूला, नंबर प्लेटशिवाय आणि लाल दिवा सुरु असताना स्कूटी चालवताना पकडलेल्या महिलेने अधिकाऱ्याच्या प्रश्नांना एका मजेदार उत्तर दिले: “मै हुन शिनचॅन नोहारा। मुझे कोई नहीं ले जा सकता.” (मी शिंचन नोहारा आहे. मला कोणीही घेऊ शकत नाही)." तिने केलेल्या शिनचॅनच्या नक्कलमुळे या गुन्ह्याला विनोदी स्वरूप आले.

Viral video
Sania Mirza and Mohammed Shami : सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी अडकले विवाह बंधनात ? वाचा सविस्तर

ट्राफिक पोलिस अमर कटारिया, जे डिजिटल क्रिएटर म्हणून ओळखले जातात त्यांनी इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. गाडी थांबवल्यावर, महिलेने तिच्या ओळखीबद्दल विनोद केला आणि तिच्या उल्लंघनाच्या गांभीर्याकडे दुर्लक्ष करून कार्टून पात्राचे अनुकरण करत राहिली. कटारियाने तिला ट्रॅफिक चालानची माहिती दिली आणि धीराने तिच्या कृत्यांशी जुळवून घेतले.

Viral video
Viral Video: कोट्यवधीच्या लॅम्बोर्गिनीला कोस्टल रोडवर आग, बर्निग कारचा VIDEO व्हायरल

एका क्षणी, एका वाटसरूने हस्तक्षेप केला, तिच्या वतीने दंड भरण्याची ऑफर दिली आणि अधिकाऱ्याला तिला जाऊ देण्याची विनंती केली. व्यत्ययाकडे दुर्लक्ष करून, कटारियाने विनोदाचा वापर करून रस्ता सुरक्षेचे महत्त्व सांगितले आणि तिला इशारा दिला की हेल्मेटशिवाय, "यमराज (मृत्यूचा देव) तिच्यासाठी येऊ शकतो." मुलीने हसून हसून उत्तर दिले: “ये यमराज कोण है? आपके पापा. (तुझे वडील 'यमराज' कोण आहेत?)”

तीने हसून उत्तर दिले की, यमराज त्या अधिकाऱ्याचे वडील आहेत का, असे विचारले आणि आत्मविश्वासाने सांगितले की तिचे नाव “शिनचॅन नोहारा” असल्याने तिला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. अधिकाऱ्याच्या शांत आणि संयमी प्रतिसादाने आणि तिच्या खेळकर वर्तनाने ऑनलाइन लोकांची मने जिंकली आहेत आणि ही घटना व्हायरल झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com