Brides Grandmother Dance Video: लग्नसमारंभ म्हणजे हसू, मजा, उत्सव आणि नातीगोती एकत्र येऊन साजरा होणारा सोहळा. त्यातही जर हळद समारंभ असेल, तर रंग उधळले जातात, ढोलताशांचा गजर होतो आणि सगळीकडे उत्साहाची लाट उसळते. पण जर या सगळ्यांमध्ये एखादी आजी आपल्या नातीच्या हळदीत अशी काही धम्माल करेल, की उपस्थितांनाही थक्क करेल, तर? होय, असाच एक प्रसंग सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
एका नातीच्या हळदी समारंभात तिच्या आजीचा डान्स (Dance)पाहून सगळेच आश्चर्यचकित झालेले आहेत. पांढऱ्या केसांची ही आजी, वयाच्या आठव्या दशकात असली तरी उत्साहात मात्र तरुणांनाही लाजवेल अशी आहे. पारंपरिक साडी, कपाळावर टिळा आणि चेहऱ्यावर आनंदाचा झळाळता प्रकाश असे सर्व दृश्य जणू दिसून येत होते.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील swapnilmane6534 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक लाईक्स आणि व्ह्यूज मिळालेले आहेत. तर आजींचा डान्स व्हिडिओ फेसबूक, एक्स(ट्वीटर) अशा माध्यमांवरही लोकांनी शेअर करत आजींचे कौतुक केलेले आहे.
या व्हिडिओवर(Video) लोकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील एकाने म्हटलं की,''खरे तरुण मनाचेच!'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं की,"आजी म्हणजे सगळ्यांसाठी प्रेरणा." अनेकांनी या आजीचे कौतुक करत म्हटलं की, वय कितीही असलं, पण मनात जर उत्साह असेल, तर आयुष्य आनंदात जगता येतं, अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.