Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नादाला वय लागत नाही! नातव्याच्या लग्नात आजोबांचा दमदार डान्स; VIDEO एकदा पाहाच

Dance Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ काहीसा हटके आहे. ज्या व्हिडिओमध्ये एका आजोबांनी नातवाच्या लग्नात डान्स करुन सर्वांना अवाक् केले आहे.

Tanvi Pol

Grandfather Dance Viral Video: वय फक्त एक संख्या आहे, हे या आजोबांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय! नातवाच्या लग्नात स्टेजवर जाताच आजोबांनी असा धम्माकेदार डान्स केला की, लग्नातील प्रत्येकजण अवाक् झाले. त्यांच्या एनर्जेटिक स्टेप्स पाहून तरुणाईलाही लाज वाटली असेल. सोशल मीडियावर सध्या आजोबांच्या डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

आजोबांचा असा डान्स कधी पाहिला का?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आजोबा तुम्हाला जबदरस्त जोशात गाण्यावर नाचताना दिसत आहे. त्यांना कमरेचा ठेका आणि चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सगळंच परफेक्ट जमलेले आहे. आजोबांच्या डान्समुळे( Dance) संपूर्ण मांडवात जल्लोषाचं वातावरण तयार झालेले आहे शिवाय त्यांच्या सोबत घरातील अन्य मंडळीही नाचताना दिसत आहेत.

हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील motivation_line_ या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत शिवाय हजारोंच्या संख्येने लाईक्स आणि व्ह्यूज मिळवून दिलेले आहेत.

व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''आजोबांचा नादच खुळा'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''लग्नात माहोळ आणला आजोबांनी'' शिवाय तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''जुने ते सोने'' अशा प्रकारे अन्य यूजर्संनीही आजोबांच्या उत्साहाचे कौतुक केलेले आहे.

टीप: आजोबांचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT