Gold Silver Panipuri  Saam Tv
व्हायरल न्यूज

Gold Silver Panipuri : श्रीमंतीचा शाही थाट; सोन्या-चांदीची पाणीपुरी खाल्लीय का? VIDEO होतोय व्हायरल

Gold Silver Panipuri Viral Video: आता पाणीपुरीची फ्युजन डिश समोर आली आहे. सोशल मीडियावर सोन्या-चांदीच्या पाणीपुरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Rohini Gudaghe

पाणीपुरी हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दुकानदार गोल्ड-सिल्वर पाणीपुरी (Gold Silver Panipuri Video) विकत असल्याचं दिसत आहे. त्याने या व्हिडिओला गोल्ड-सिल्वर पाणीपुरी असं कॅप्शन दिलेलं आहे. सध्या हा पाणीपुरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, दुकानदार प्रथम बारीक चिरलेले बदाम, काजू आणि पिस्ते पाणीपुरीमध्ये घालतो. नंतर तो पाणीपुरीची चव वाढवण्यासाठी (Panipuri Video) त्यात मध टाकतो. यानंतर तो सोन्या-चांदीच्या कव्हरने या पाणीपुरीला सजवतो. त्यानंतर त्याची गोल्ड-सिल्वर पाणीपुरी तयार होते. तो ही पाणीपुरी ग्राहकांना सर्व्ह करताना दिसतो.

आपण पाणीपुरी खाताना मसालेदार, आंबट आणि गोड पाणी घेणं पसंत करतो. पण अहमदाबादच्या एका पाणीपुरीवाल्या (Panipuri Viral Video) भैयाने या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हा भाऊ बटाटे आणि पाण्याऐवजी चक्क ड्रायफ्रुट्स आणि मध घालून पाणीपुरी बनवत आहे आणि त्यावर सोन्या-चांदीचं कव्हर देखील लावत आहे.

आपण तिखट, आंबड-गोड किंवा थंडाई घातलेली पाणीपुरी अनेकदा खाल्ली आहे. परंतु या दुकानदाराने पाणीपुरीचं रूपच बदलून टाकलं आहे. त्यामुळे पाणीपुरी प्रेमींना जबरदस्त धक्का बसला (Gold Silver Panipuri) आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून या व्लॉगरने दावा केलाय की, तुम्ही यापेक्षा जास्त स्वच्छतापूर्ण पाणीपुरी कधीच खाल्ली नसेल. त्यांनी सांगितलं आहे की, ही सोन्या-चांदीची पाणीपुरी तुम्हाला अहमदाबादमध्ये पाहायला (viral news) मिळेल.

आज काल स्ट्रीट फुडचे अनेक अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सध्या फ्युजन डिश लोकप्रिय होत आहेत. अनेकदा अशा अतरंगी डिशचे व्हिडिओ देखील सोशल (viral) मीडियावर व्हायरल होत असतात. पाणीपुरीचं नाव जरी काढलं, तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. आता याच पाणीपुरीची फ्युजन डिश समोर आली आहे.

अनेक नेटकऱ्यांना वाटतंय की, फ्युजनच्या नावाखाली (viral video) पाणीपुरीचा छळ होत आहे. पाणीपुरीची ही रेसिपी इंटरनेटवर सध्या फिरत आहे. अनेक नेटकरी त्यांच्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

SCROLL FOR NEXT