Girls Fighting Viral Video: सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जातं. सोशल मीडियावर दररोज नवनवीन अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर, तर काही थक्क करणारे असतात. महिलांची भांडणं, लढाई तशी काही नवी नाही. अगदी नळावर, बाजारात आणि मुंबईच्या लोकलमध्येही महिलांना तुम्ही भांडताना पाहिलं असेल. (Latest Marathi News)
सध्या सोशल मीडियावर अशाच काहीसा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक चिनी महिला भररस्त्यात एका पाकिस्तानी तरुणीला मारहाण करताना दिसून येत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Viral Video) घरच्या कलेश नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये एक चिनी महिला रस्त्याच्या कडेला एका महिलेशी केस पकडून भांडताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्याने असा दावा केला आहे, की हा व्हिडीओ पाकिस्तानमधला आहे. येथील एका तरुणीने रस्त्यावरून जात असलेल्या चिनी महिलेची छेड काढली. (Breaking Marathi News)
मग काय या महिलेने तिला जाब विचारला. क्षणात दोघींमध्ये वाद झाला. नंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर चिनी महिलेल्या पाकिस्तानी तरुणीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. जेव्हा ही महिला तरुणीला मारहाण करण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा रस्त्यावरून येणारे जाणारे लोक या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ बनवत होते.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत व्हिडीओ 15 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, 'तुम्ही चीनचे पैसे खाल्ले तर तुम्हाला कौतुक म्हणून लाथ मारावी लागेल.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'पाकिस्तानी मार खाण्यासाठी जन्माला आले आहेत.'
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.