Girls Fighting Viral Video:  Saamtv
व्हायरल न्यूज

Girls Fight Viral Video: पोरींचा राडा... भररस्त्यात तुफान हाणामारी; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video News: भररस्त्यात तरुणींचा हा राडा येणा- जाणारे वाहनचालकही पाहत होते. त्यापैकीच एकाने ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली.

Gangappa Pujari

Girls Fighting Viral Video:

सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी थरकाप उडवणारे अपघात, दे दणादण मारामारी तर कधी जबरदस्त डान्सचे हे व्हिडिओ नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये भररस्त्यात जोरदार राडा झाल्याचे दिसत आहे.

छत्तीसगडच्या (Chhatisgarh) बिलासपूरमध्ये मुलींच्या दोन गटांमध्ये राडा झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याठिकाणी मुलींच्या दोन गटांमध्ये बाचाबाची झाली आणि नंतर प्रकरण इतके बिघडले की दोन्ही गटात तुफान हाणामारी सुरू झाली. भररस्त्यात तरुणींचा हा राडा येणा- जाणारे वाहनचालकही पाहत होते. त्यापैकीच एकाने ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली.

व्हायरल (Viral Video) होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मुली एकमेकांचे केस इतके ओढत जोरदार मारामारी पाहत असल्याचे दिसत आहे. कोतवाली परिसरातील रिव्हर व्ह्यू चौपाटीजवळ ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मारामारीत काही मुलीही जखमी झाल्या आहेत. मात्र ही मारामारी का झाली याबाबत माहिती मिळू शकली नाही. ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही आणि मुलींची ओळख पटली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी मुलींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup : संजू सॅमसन, कुलदीपला डच्चू? पहिल्या सामन्यात अशी असेल भारताची प्लेईंग ११

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर ठोकले खिळे, अनेक वाहनांचे टायर फुटले; नेमका प्रकार काय? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : नागपूर विभागात पाच भागात असणार वीजपुरवठा बंद

Pune Tourism : पुणे फिरण्याचा प्लान करताय? मग 'हे' ठिकाण लिस्टमध्ये ठेवाच

Raghav Juyal : राघव जुयालने लोकप्रिय अभिनेत्रीच्या थोबाडीत मारली? पाहा व्हायरल VIDEO मागचे सत्य

SCROLL FOR NEXT