Viral Stunt Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: रिल्स बनवण्याची भलतीच हौस फिटली...स्टंट करताना जोरात आपटली; तरुणींचा VIDEO व्हायरल

Viral Stunt Video: सध्या मीडिया प्लॅटफॉर्मवर दोन तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यामध्ये रिल्स बनवण्याच्या नादात तरुणी जखमी झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Girl Stunt On Road

सध्याची तरुणाई सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेक रिल्स बनवत असते. रिल्स बनवण्यासाठी हे कोणत्याही थराला जातात,त्यासंबंधित अनेक गमतीदार आणि थरारक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या मीडिया प्लॅटफॉर्मवर दोन तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यामध्ये रिल्स बनवण्याच्या नादात तरुणी जखमी झाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रिल्स बनवण्यासाठी तरुण कोणतीही जागा सोडत नाही. लोकल ट्रेन असेल, प्रवाशांनी गर्दीने भरलेला रेल्वे प्लॅटफॉर्म असेल किंवा भररस्त्यातच असेल जिकडे तिकडे रिल्स बनवतात. परंतू व्हायरल होत असलेल्या तरुणीनी थेट पुलावर व्हिडिओ बनवला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की,' एका पुलावरुन वाहनांची ये-जा होत आहे. यामध्येच दोन तरुणी आहेत. यांच्या पैकी एक तरुणी तिच्या मैत्रिणीची मदत घेऊन तिच्या खांद्यावर पाय ठेवून स्टंट करण्याचा प्रयत्न करते. जेव्हा स्टंट करण्यास तरुणी जाते तेव्हा तीचा उलटी उडी मारण्याच्या प्रयत्न फसवून तिचा अदांज चुकतो. अदांज चुकल्यामुळे रस्त्यावर ती जोरात आपटते. रस्त्यावर पडताच तिची मैत्रिण तिला येऊन उचल्याच्या प्रयत्न करते आणि त्याच्या बाजूला असलेले इतर व्यक्तीही तिथे येतात.

व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील @somyagymnast या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. स्टंट करताना तरुणीला जोरदार लागले असल्याचे समजते.याआधीही स्टंट करताना अनेक गभीर दुखापत झालेल्या व्यक्तीचे स्टंट व्हिडिओ व्हायरल झाले आहेत तरीही फेमस होण्याच्या नादात स्टंट करण्याचे बंद होत नाहीत.

सोशल मीडियावर तरुणींच्या स्टंटचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत. व्हिडिओला हजारोंच्या घरात लाईक्स मिळाले असून मोठ्या प्रमाणात यूजर्सं व्ह्यूज मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT