Girl Dance Viral Video Saam tv
व्हायरल न्यूज

Girl Dance Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये तरुणींनी लगावले जोरदार ठुमके; प्रवासी एकटक पाहतच राहिले, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Girl Dance Viral Video In Train: धावत्या ट्रेनमध्ये तरुणींचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

Girl Dance In Train Viral Video: सध्या सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. आता अनेक जणांना सोशल मीडियाच्या वापराचं व्यसन लागलं आहे. याच सोशल मीडियावर नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. याचदरम्यान, धावत्या ट्रेनमध्ये तरुणींचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

सध्या सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडिओंचा बोलबाला आहे. असे अनेक शॉर्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. डान्सचे शॉर्ट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. मात्र, अनेक जण शॉर्ट व्हिडिओ करताना आजूबाजूंच्या लोकांचा अजिबात विचार करत नाही. असाच एक शॉर्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

धावत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये तरुणींनी कमाल असे ठुमके लगावले आहेत. तरुणींनी धावत्या ट्रेनमध्ये केलेला डान्स नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. तरुणींच्या डान्सवरून काही नेटकऱ्यांकडून खिल्ली उडवली जात आहे.

धावत्या ट्रेनमध्ये डान्स

एका नेटकऱ्याने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे . या व्हिडिओमध्ये तरुणींनी कमाल डान्स केला आहे. या तरुणींनी 'खुदकुशी का शौक हो तो' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. या तरुणींनी डान्स स्टेप्स देखील भन्नाट केला आहे.

या व्हिडिओमध्ये आजबाजूचे प्रवासी एकटक पाहताना दिसत आहे. या तरुणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

सोशल मीडियावर या तरुणींचा डान्सचा व्हारयल झाला आहे. काही लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. मात्र, अनेक नेटकऱ्यांनी तरुणींचा डान्स पाहून त्यांना ट्रोल केले आहे. नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की, या तरुणींना एवढा आत्मविश्वास कुठून येतो? यांचा डान्स पाहून आजूबाजूचे प्रवासीही चकीत झाले आहे.

काही नेटकऱ्यांनी रेल्वेला तरुणींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारण असे व्हिडिओ पाहून दुसरे ट्रेनमध्ये डान्स करायला सुरू होतील, यामुळे कारवाईची मागणी केल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanteras Wishes : आली दिवाळी! मराठी, हिंदी आणि इंग्रजीत धनतेरसचे प्रियजनांना पाठवा खास मेसेज

Dhanteras 2026 : धनतेरसला पैसे उधार दिले तर घरात येते गरिबी? काय सांगते धार्मिक मान्यता?

ZP अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; घरात सापडलं अडीच किलो सोनं, 11 किलो चांदी

दिवाळीची मिठाई खाताना सावधगिरी बाळगा! मिठाईला चांदीचा वर्ख की अल्युमिनियम फॉईल?

विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार; NDA मधील मित्रपक्षाचा भाजपाला इशारा

SCROLL FOR NEXT