Girl Dance Viral Video Saam tv
व्हायरल न्यूज

Girl Dance Viral Video: दिलबर दिलबर.....वाडीतल्या लोकांच्या फर्माइशवर तरूणी बेभान नाचली, नुसता राडा आणि धुरळा...

Girl Dance Viral Video: तरुणीने केलेला जबरदस्त डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे

Vishal Gangurde

Girl dance viral video:

लग्न कार्य किंवा सणासुदीत घरात एक आनंदाचं वातावरण असतं. अशा काळात घरात नातेवाईकांचा गोतावळा जमा झालेला असतो. या काळात वाडी-वस्तीतील लोकांमध्येही उत्साह पाहायला मिळतो. सर्व मंडळी गप्पा-गाण्यात दंग झालेले असतात. याच अशा आनंदाच्या वातावरणात वाडीतील लोकांनी एका तरुणीला नाचण्याचा आग्रह केला. त्यानंतर तरुणीने केलेला जबरदस्त डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

सोशल मीडियामुळे गावागावातील छुप्या कलाकारांनाही हक्काचा प्लॅटफॉर्म मिळत आहे. सोशल मीडियामुळे छुपे कलाकारही रातोरात प्रसिद्धी झोतात येऊ लागले आहे. कोकणातील तरुणीही तिच्या नृत्यामळे चर्चेत आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीमधील ही तरुणी आहे. गुलाबी रंगाचा ड्रेस परिधाण केलेल्या या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या तरुणीला वाडीतील लोकांनी नाचण्याची फर्माइश केली. तरुणीने लोकांची फर्माइश मान्य करत 'दिलबर दिलबर' या गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावले. पूजा पवार असे या तरुणीचे नाव आहे.

या तरुणीने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. तिचा व्हिडिओवर नेटकऱ्यांनी शेकडो प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, 'अनपेक्षित, अविश्वसनीय, लाजवाब डान्स केला. पुन्हा पुन्हा बघत राहावा वाटतोय'. तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले की, 'ताई तुमच्यात रश्मिका मंदानाची झलक दिसत आहे'.

या तरुणीच्या व्हिडिओला नऊ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर चारशेहून अधिक जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो जणांनी पाहिला आहे. या तरुणीने व्हिडिओ शेअर करत 'माझ्या प्रिय वाडीतल्या लोकांची फरमाईश. माझ्या वाडीतील लोक लय भारी', असं कॅप्शन दिलं आहे. तसेच तिने वैभववाडी, सिंधुदुर्ग, कोकण हे हॅशटॅग वापरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT