Gautami Patil Video Saam TV
व्हायरल न्यूज

Gautami Patil Video: तरुणाने चक्क गौतमी पाटीलची ऑफर रिजेक्ट केली? अतरंगी मीम्स व्हिडीओ व्हायरल

Gautami Patil Mims Video: त्यावर या तरुणाने व्हिडीओ एडिट करून नको नको असं म्हणत स्वत:चा व्हिडीओ तेथे पोस्ट केला आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यावर गौतमीची ऑफर त्याने रिजेक्ट केल्याचं वाटतंय.

साम टिव्ही ब्युरो

Gautami Patil Viral Video:

सबसे कातील म्हटलं की, तोंडून अपसूकच गौतमी पाटील हे नाव ओठांवर येतं. गौतमीच्या गाण्याने आणि डान्स स्टेप्सने आजवर लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. सुरुवातीला वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर गौतमीची क्रेझ आता सर्वत्र पसरली आहे. अशात सोशल मीडियावर गौतमीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये गौतमीने दिलेली ऑफर एका तरुणाने रिजेक्ट केल्याचं दाखवण्यात आलंय. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गौतमी मी येत आहे तुम्ही पण या असं म्हणत आहे. त्यावर या तरुणाने व्हिडीओ एडिट करून नको नको असं म्हणत स्वत:चा व्हिडीओ तेथे पोस्ट केला आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यावर गौतमीची ऑफर त्याने रिजेक्ट केल्याचं वाटतंय.

मात्र तसं काही नसून गौतमीचा हा व्हिडीओ एका कार्यक्रमासाठीचा आहे. एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केल्यानंतर त्याच्या जाहिरातीसाठी गौतमी अशा पद्धतीचे व्हिडीओ रेकॉर्ड करत असते. मात्र या तरुणाने तिचा हाच व्हिडीओ एडीट केलाय आणि त्यावर मीम्स बनवलं आहे. @shrabh_g_mulla या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून गौतमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

गौतमी पाटील तिच्या कार्यक्रमांमुळे नेहमीच चर्चेच असल्याचं पाहायला मिळतं. कार्यक्रमात तरुणांनी केलेला राडा, गोंधळ यांसह गौतमीच्या अदा आणि डान्स यांचे आजवर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

काल देखील लातूरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांनी हुल्लडबाजी करत राडा केला. यावेळी गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला होता. त्यानंतर पोलिसांनी गौतमी पाटीलचा कार्यक्रम बंद केला. या कार्यक्रमातील व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत तसेच गौतमीवर बनवलेला हा मीम्स व्हिडीओ देखील जोरदार व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT