Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: फायर आजी! थेट ट्रॅक्टरवर उभं राहून आजीबाईचा धमाकेदार डान्स; विसर्जन मिरवणुकीतील VIDEO पाहून पुणेकर आवाक्

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अखेरीस काल गणेश विसर्जनाची सांगता झाली. राज्यात गेल्या काही आठवड्यापासून लाडक्या गणरायाचा उत्सव थाटा-माटात पार पडला. प्रत्येकजण गयरायाच्या भक्तीत मग्न झाले होते. सोशल मीडियावर आपल्याला राज्यभरात पार पडलेल्या गणेशोत्सवाचे आनंददायी क्षण पाहण्यास मिळाले. कुठे लहानग्या मुलांचे मिरवणुकीतील डान्स तर कुठे आरतीच्या वेळी मस्ती. सध्या सोशल मीडियावर पुणे शहरातील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीतील व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एका आजींचा डान्स खास ठरला आहे.

सोशल (Social) मीडियाच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या मुंबईसह राज्यातील गणेश विसर्जनाचे क्षण पाहण्यास मिळाले. गणेश विसर्जन (Visarjan) करताना प्रत्येकाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळाला. यामध्ये कोणीही आपल्याला निराश पाहायला मिळाला नाही. अशातच सोशल मीडियावर जो आजींचा व्हिडिओ (Video) व्हायरल झालेला आहे. जो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस पडलेला आहे.

पाहा तरी व्हिडिओत काय?

व्हायरल व्हिडिओ पुणे शहरातील असून तो गणेश विसर्जन मिरवणुकीतल असल्याचे दिसते. या विसर्जन मिरवणुकीत प्रत्येकजण लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी जमलेले आहेत, अशातच सर्वजण गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. मात्र या विसर्जन मिरवणुकीत एक आजी एका ट्रक्टरवर उभ्या असलेल्या दिसून येत आहेत.

मात्र ''तुम तो धोखेबाज हो'' हे गाणं सुरु होताच आजींनी जो काही ताल ठरला तो प्रत्येकाला आवडलेला आहे. आजींचामध्ये तोलही जातो मात्र स्वत:ला सावरुन पुन्हा एका नवीव जोशमध्ये आजी परत डान्स करण्यास सुरुवात करतात. आजींना पाहून प्रत्येकजण त्यांना डान्स करण्यास साथ देतो. सर्व व्हिडिओ गणेश विसर्जन मिरवणुकीतील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

नेटकऱ्याच्या प्रतिक्रिया....

आजींचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे, मात्र तो व्हिडिओ इन्स्टाग्राम या प्लॅटफॉर्मवरील ''@punepulse'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्मवर व्हायरल होताच सर्व नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतील आलेला आहे. व्हिडिओला अनेकांनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने कमेट्स बॉक्समध्ये लिहिले आहे की, खरा आनंद तर या आजींनी साजरा केला आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' आमच्या ओळखीच्या आजी आहेत या'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,'' मस्तच''

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT