Ganpati Bappa Eating Ladoo Saam TV
व्हायरल न्यूज

Ganpati Bappa Eating Ladoo: तुला लाडू देऊ का? बाप्पाला विचारला प्रश्न; चिमुकलीचे बोबडेबोल व्हायरल

Ganeshotsav Child Girl Viral Video: बाप्पाच्या आगमनाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Ruchika Jadhav

Ganpati Bappa:

गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र धुमधाम पाहायला मिळत आहे. अनेकांच्या घरी गणरायाचे आगमन आजच झाले आहे. बाप्पा घरी आल्याने वातावरण अगदी प्रसन्न झालंय. बाप्पाच्या आगमनाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या सर्वांमध्ये एका चिमुकलीच्या व्हिडीओने सर्वांनाच भूरळ घातली आहे. (Latest Cute Girl Viral Video)

लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं म्हणतात. तर व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली गणपती बाप्पासमोर बसली आहे. बाप्पाकडे ती बोबड्या बोलांत आशिर्वाद मागतेय. तसेच एवढीशी मुलगी बाप्पाला तुला लाडू पाहिजे का? तुला देऊ का लाडू असं विचारत आहे. चिमुकलीने चक्क गणरायाला तुला लाडू देऊ का? असं विचारल्याने सारेच तिचं कौतुक करतायत.

गणपतीच्या दिवसांमध्ये सगळीकडेच उत्साह आणि गोडधोड मिठाई खाण्याची मज्जा असते. अशात मोदक खायला आणि लाडू खायला सर्वांनाच आवडतं. या चिमुकलीने देखील बाप्पाला सुद्ध लाडू हवा असेल असं समजून गणरायाला प्रश्न विचारला आहे.

चिमुकली अगदी निरागसपणे बाप्पाशी संवाद साधत आहे. तु मला बरं ठेव. मला मोठं कर, असं ही चिमुकली बाप्पाला सांगत आहे. सध्या चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. @DaminiBinnar या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या इंस्टा अकाउंटवर तिचे अनेक व्हिडीओ आहेत.

नेटकऱ्यांनी चिमुकलीच्या व्हिडीओवर विविध कमेंट केल्यात. अनेकांनी यावर हार्ट इमोजी पोस्ट केलेत. तसेच काहींनी चिमुकलीला खुप खुप आशीर्वाद दिले आहेत. तिच्या बोलण्याचं कौतुकही केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT