आजकाल अन्नातील प्रयोग मोठ्या प्रमाणावर सुरू असून, हा ट्रेंड केवळ हॉटेल्सपुरता मर्यादित राहिलेला नाही. रस्त्यावरील फेरीवाले आणि ढाबा मालकही नवनवीन पदार्थ तयार करण्यासाठी प्रयोग करत आहेत. प्रत्येकाला स्वतःला शेफ समजून काहीतरी वेगळं सादर करण्याची इच्छा असते. काही वेळा या प्रयोगांमधून अनोख्या चवदार डिशेस तयार होतात, तर कधी विचित्र कल्पना जनतेला चकित करतात. सध्या असाच एक अनोखा सँडविच चर्चेत आहे, जो लोकांच्या कुतूहलाचा विषय बनला आहे. हा ट्रेंड केवळ चव वाढवण्यासाठी नसून, अन्नात नावीन्य शोधण्याची आणि लक्ष वेधून घेण्याची एक स्पर्धा बनला आहे.
हिवाळा आला की गाजराचा हलवा हा उत्तर भारतातील प्रत्येक घरातील गोड पदार्थ ठरतो. नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान गाजरांची मोठी आवक बाजारात होत असल्याने हलव्याचा आनंद घेण्याचा उत्साह वाढतो. मात्र, हलकं-फुलकं खाण्याच्या नावाखाली काहींनी या पारंपरिक पदार्थावर फ्युजनची छटा चढवली आहे. सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत, रस्त्यावरील विक्रेत्याने गाजराच्या हलव्याचे अनोखे सँडविच बनवल्याचे दिसते. हा फ्युजन प्रयोग पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. पारंपरिक गोडाच्या या नवीन रूपाने लोकांमध्ये कुतूहल निर्माण केले असून काहींनी या प्रयोगाचे कौतुक केले.
व्हिडिओत दिसणारा अनोखा फ्युजन ट्रेंड लोकांचे लक्ष वेधत आहे. एका व्यक्तीने ५० रुपयांचा गाजर हलवा विकत घेतला आणि तो सँडविच विक्रेत्याकडे नेला. विक्रेत्याने ब्रेडवर गाजर हलवा आणि बटर लावले, त्यानंतर सँडविच टोस्टरमध्ये बेक केले. तयार झालेल्या सँडविचला चार भाग करून त्यावर क्रीम आणि बटर घालून ग्राहकाला दिले. या अनोख्या प्रकाराने काही लोक उत्सुकता दाखवत आहेत, तर काही पारंपरिक चवीत झालेल्या या बदलावर आश्चर्य व्यक्त करत आहेत.
सोशल मीडियावर "swaad_indore_da" नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहून कमेंट्समधून मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले, आता भाऊ, गाजर हलव्याने तुझे काय नुकसान केले आहे, त्याच्यासोबत इतका अत्याचार का? तर दुसऱ्याने लिहिले की, या हलव्यासोबत होणारा अत्याचार आम्ही अजिबात सहन करणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.