Birthday Cake Video:
वाढदिवस म्हटलं की केक हे ठरलेलं असतं. आजकाल वाढदिवस साजरा करण्याचा ट्रेंड बदलेला आहे. आजकाल लहान मुला-मुलींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडत्या थीमनुसार, विविध आकारांचे आणि आकर्षक डिझाईन्सचे केक बनवून घेतले जातात; ज्याला 'कस्टमाईज्ड केक' म्हणतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अनोख्या आणि भव्य केकचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, लाडक्या लेकीच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त अत्यंत हटके अंदाजात खास फ्रॉकच्या डिझाईनचा केक बनवून घेतला आहे, ज्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
मुलीचा पाचवा वाढदिवसानिमित्त राजकुमारीच्या फ्रॉकसारखा दिसणारा भव्य केक बनवला आहे. तुम्ही जर या व्हिडीओमध्ये पाहिलात तर, हा केक एखाद्या खऱ्याखुऱ्या डिझायनर फ्रॉकप्रमाणे दिसतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये केक स्टेप बाय स्टेप कसा तयार केला गेला हे सांगितलं आहे तसेच केकचा बेस तयार करण्यापासून ते त्यावर हार्ट शेपची डिझाईन करण्याची कला थक्क करणारी आहे.
केकचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, हा केक आकाराने बराच मोठा आणि दिसायला खऱ्या फ्रॉकसारखाच आहे. वाढदिवसाच्या पार्टीत हा भव्य आणि सुंदर केक पाहून चिमुकलीसह उपस्थित सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओेवर बऱ्याचजणांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. तर अनेकांनी केक बनवणाऱ्या कलाकाराचे कौतुक केले आहे.