Manasvi Choudhary
सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन चे विविध फोटो आणि कोडी प्रचंड व्हायरल होत आहेत. जे सामान्य दिसतात पण वाटतात तितके सोपे नसतात.
या चित्रांमध्ये लपलेल्या गोष्टी शोधणे हा अनेकांसाठी एक आवडीचा आणि मनोरंजक खेळ आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये तुम्हाला उंदीर शोधायचे आहे.
या फोटोमध्ये अनेक मांजर एकमेकांच्या जवळ झोपलेल्या दिसत आहेत. त्यांच्यामध्ये लपलेलं उदीर शोधणे तुम्हाला कठीण वाटू शकते. मांजरामध्ये उंदीर अशा ठिकाणी लपलेलं आहे ते पहिल्यांदा नजरेत दिसत नाही.
पहिल्यांदा पाहिल्यास तु्म्हाला केवळ मांजरच दिसेल पण जेव्हा तुम्ही अत्यंत बारकाईने डावीकडून उजवीकडे बघता तेव्हा तुम्हा मांजरामधील पंजा, चेहरा यांच्यामध्ये एक छोटा उंदीर दिसेल. उंदीर मांजरापेक्षा खुपच लहान आहे.
हे कोडे सोडवण्यासाठी वाचकांकडे १० मिनिटांचा कालावधी असतो. पहिल्या नजरेत हे उंदीर सहसा सापडत नाहीत, ज्यामुळे डोळ्यांची आणि बुद्धीची चांगलीच कसरत होते.
चित्रामध्ये लपलेल्या गोष्टी शोधताना डोळे आणि मेंदू अधिक सक्रिय होतो. तसेच अशा प्रकारची कोडी सोडवल्यामुळे मेंदूची एकाग्रता आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते.