Manasvi Choudhary
सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन चे विविध फोटो आणि कोडी प्रचंड व्हायरल होत आहेत.
हे फोटो पाहताना जेवढे साधे वाटतात, तितकेच ते हुशारीने बनवलेले असतात. या चित्रांमध्ये पाहून प्रश्नांचे अचूक उत्तर द्यायचे आहे.
या फोटोमध्ये तीन निळे ड्रम दिसत आहेत. या तीन ड्रम्सपैकी कोणता ड्रम आधी रिकामा होईल हे ठरवायचे आहे.
चित्रातील ड्रमला A,B आणि C अशी नावे दिली आहेत. या तिन्ही ड्रममध्ये पाणी भरलेले आहे. आणि प्रत्येक ड्रमच्या वेगवेगळ्या उंचीवर छिद्र आहे. या छिद्रांमधून पाणी सतत बाहेर वाहत आहे.यावरून तुम्हाला ठरवायचे आहे की, सर्वातआधी कोणता ड्रम रिकामा होणार आहे.
याचे उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला केवळ पाण्याचा प्रवाह नाही तर ड्रमला कोणत्या उंचीवर छिद्र पाडले आहे आणि पाण्याची पातळी कमी झाल्यास काय होईल हे लक्षात घ्या.
हे कोडे सोडवण्यासाठी तुमच्याकडे १० मिनिटांचा कालावधी असेल. हे कोडे सोडवल्यामुळे डोळे आणि मेंदू अधिक सक्रिय होतो. तसेच अशा प्रकारची कोडी सोडवल्यामुळे मेंदूची एकाग्रता आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते.