fights slaps abuses as fight breaks out in crowded mumbai local video went viral  Twitter
व्हायरल न्यूज

Fight In Mumbai Local: लोकलमध्ये दंगल! महिलांची फ्री स्टाईल हाणामारी; एकमेकींच्या झिंज्या धरुन धो- धो धुतलं... व्हिडिओ

Viral Video: मुंबई लोकलमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Mumbai Local Train Fight Viral Video:

मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफ लाईन समजली जाते. लाखो लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लोकल ट्रेनचा वापर करतात. प्रचंड गर्दी असल्याने धक्का बुक्की देखील होत असते.

अनेकदा धावत्या लोकलमध्ये धक्काबुक्की झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की,उभी असलेली महिला सीटवर बसलेल्या मुलीसोबत बाचाबाची करताना दिसून येत आहे.

या दोघांमध्ये नेमकं काय धडलं,हा वाद कशावरुन झाला हे कळू शकलेलं नाही. मात्र त्या महिलेचा राग पाहुन प्रकरण गंभीर असल्याचं दिसून येत आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की, उभी असलेली महिला त्या मुलीसोबत वाद घालत असताना तिला कानाखाली वाजवते. महिलेच्या वयाचा मान ठेवत ती मुलगी खाली बसते. मात्र त्या महिलेचा राग काही कमी होत नाही.

ती महिला मुलीला बोट दाखवून काहीतरी बोलताना दिसून येत आहे. महिलेने मर्यादा ओलांडल्यानंतर ती मुलगी देखील तिला प्रत्युत्तर देऊ लागली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. (Viral Video)

सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. ज्यात पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये असलेली महिला पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये असलेल्या महिलेला मारहाण करताना दिसून येत आहे.

बाचाबाची झाल्यानंतर पांढऱ्या ड्रेसमध्ये असलेली महिला पिवळ्या ड्रेसमध्ये असलेल्या महिलेला कानाखाली मारते त्यानंतर दोघेही एकमेकांचे केस ओढू लागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

SCROLL FOR NEXT