Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Wedding Viral Video : मटनावरून लग्नात तुफान राडा; खुर्च्या, प्लेट मिळेल त्याने पाहुण्यांनी एकमेकांना धू धू धुतलं...!

VIral Fighting VIdeo : लग्न समारंभात काही पुरुष हिंसकपणे हाणामारी करताना व्हिडीओत दिसत आहेत.

प्रविण वाकचौरे

Viral Video :

पाकिस्तानच्या एका लग्नातून एक विचित्र घटना समोर आली आहे. लग्नाचं हसतं खेळतं आनंदी वातावरण अचानक फायटिंग रिंगमध्ये बदललं. जेवणात मटनाचे पीस कमी मिळाल्यावरुन हा सगळा राडा झाला आहे. मारहाणीची ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

लग्न समारंभात काही पुरुष हिंसकपणे हाणामारी करताना व्हिडीओत दिसत आहेत. एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका माणसाला त्याच्या बिर्याणीत मटणाचे कमी पीस मिळाले, त्यानंतर हा सगळा गोंधळा झाला.

व्हायरल झालेल्या ६ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला लग्नात टेबलवर सर्व पाहुणे जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. दरम्यान काहीजण टेबलजवळ येतात आणि एका व्यक्ताली काहीतरी विचारणा करतात. त्यानंतर अचानक एकमेकांना मारायला सुरुवात करतात. (Viral News)

काही समजण्याआधीच मोठा राडा लग्नसमारंभात झाला. पाहुणे मंडळी एकमेकांवर खुर्च्या देखील फेकताना दिसले. भांडण इतकं वाढलं की पाहुणे हाती लागेल त्याने एकमेकांना मारत होते. अखेर वाद थांबवण्यासाठी महिलांना मध्यस्थी करावी लागली. (Latest Marathi News)

मात्र तरीही हा गोंधळ थांबण्याचं नाव घेत नव्हता. त्यानंतर काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आली. कलेश नावाच्या अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. 24 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 8.20 वाजता ही घटना घडल्याचं व्हिडीओतून दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

Maharashtra Live News Update: संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्याचे पालिका आवारात करण्यात आले भूमिपूजन

करोडपती बनायचंय मग PPF मध्ये करा गुंतवणूक; आयुष्यभर दरमहा मिळतील 61,500 पेन्शन

Viral Video: जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ, मुलाने पहिल्यांदा विमानात बसवलं; माऊलीच्या डोळ्यांतून वाहू लागले सुखाचे अश्रू

SCROLL FOR NEXT