Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: फुलांचा नव्हे, तर पैशांचा हार! वडिलांनी लाडक्या लेकीला वाढदिवशी दिले भन्नाट गिफ्ट; पाहा VIDEO

Viral News: प्रत्येकजण अनेकांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनेक भेटवस्तू देत असतो. मात्र सध्या भन्नाट एका भेटवस्तूचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Birthday Celebration Video: गेल्या काही वर्षात बालहत्या झाल्याचे प्रमाण अधिक समोर आले आहे. मग हे प्रमाण महाराष्ट्रसह अनेक देशभरात घडत होते. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे जो व्हिडिओ या घटनेच्या खूप वेगळा आहे. ज्यात एका मुलीच्या वाढदिवसानिमित्ताने एका वडिलांनी चिमुकलीला चक्क खऱ्या पैशांचा हार भेट देत तिचा वाढदिवस साजरा केलेला आहे. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतीस येत आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक चिमुकलीने वाढदिवसानिमित्ताने छानसा ड्रेस परिधान केलेला. चिमुकली समोर तुम्हाला वाढदिवसाचा एक केक दिसत आहे. काही वेळात तिथे चिमुकलीचे वडिल येतात आणि तिच्या गळ्यात खऱ्या पैशांनी तयार केलेला हार गळ्यात घालतात नंतर तिच्या हातात अनेक चॉकलेट्स (Chocolates) देतात. अशा पद्धतीने मुलगी नाही तर घरात लक्ष्मी आहे असे समजून लेकीचा वडिल वाढदिवस साजरा करत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मोठ्या चर्चेचा विषय ठरलेला आहे.

व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''omkar7087'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. सात तासापूर्वी व्हिडिओ शेअर करण्यात आला असून काही वेळात व्हिडिओला लाखोंच्या संख्येने नेटकऱ्यांचे व्ह्यूज मिळत आहे.

एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''मस्तच भावा'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''भावा मस्त केले काम'' तर अनेक यूजर्संनी चिमुकलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत तर अनेकांनी चिमुकलीच्या वडिलांचे कौतुक केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga For Weight Loss: डाएट आणि एक्सरसाइझ करूनही वजन कमी होत नाही? मग रोज २० मिनिटं करा 'हा' एक योगा

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या १३ जणांची सुखरूप सुटका

Farmer Loan Waiver Scheme: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ

Viral News : ज्या बॉसला किडनी दिली त्यानेच महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढलं

Diabetes Care in Monsoon: पावसाळ्यात ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायची आहे? मग, या ७ गोष्टींची नक्की घ्या काळजी

SCROLL FOR NEXT