Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: लाईक्ससाठी काहीही! बाप-लेकीने बेडरुममध्ये केले असे कृत्य; नेटकऱ्यांचा संताप अनावर | VIDEO

Father And Daughter Shocking Video: बाप लेकीच्या कृत्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Gangappa Pujari

Father Daughter Viral Video:

सध्या सर्वांनाच सोशल मीडियाचे प्रचंड वेड आहे. वय आठ असो किंवा ८० सोशल मीडियावर रिल्स बनवने, तासनतास व्हिडिओ पाहण्यात अनेकजण वेळ घालवत असतात. तरुण- तरुणी लाईक्स मिळण्यासाठी वेगवेगळे क्लृप्याही लढवत असतात. असाच एका बाप- लेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओची रिअल स्टोरी, जाणून घ्या सविस्तर.

सोशल मीडियावर (Social Media) लाईक्स मिळण्यासाठी, फेमस होण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. माध्यमांवर चर्चेत येण्यासाठी अनेक जण नको ते पराक्रम करत असतात. कधी गाडीवर रोमान्स, कधी जीवघेणा स्टंट तर कधी ट्रेनमध्येच अतरंगी डान्स अन् अश्लिल कृत्य करत नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात.

सध्या अशाच एका बाप लेकीच्या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. रिल्स बनवताना या दोघांनी बेडरुममध्ये केलेल्या कृत्याने सध्या ते नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. बाप- लेकीच्या नात्याचा तरी आदर ठेवा, सन्मान ठेवा.. अशा शब्दात नेटकऱ्यांनी या दोघांना फटकारले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) मुलगी आणि वडील बेडरुममध्ये रिल्स बनवत असल्याचे दिसत आहे. यावेळी मुलगी तुमच्यासाठी ते काका असतील, माझ्यासाठी शुगर डॅडी आहेत असे म्हणते अन् दोघेही स्वतःला ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून घेतात. बाप लेकीच्या याच कृत्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

 श्वेता पुंदीर (Shweta Pundir) या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. श्वेता पुंदीर ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असल्याचे तिच्या अकांउटवरील व्हिडिओंमधून दिसत आहे. इंस्टाग्रामवर तिचे तब्बल ३ लाख ९० हजार इतके फॉलोअर्स आहेत. मात्र तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी नाराजी दर्शवली आहे.

व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना काही नेटकऱ्यांनी बाप- लेकीचे नाते पवित्र असते. त्याला चुकीच्या पद्धतीने दाखवू नका.. असा सल्ला दिला आहे. तर काही नेटकऱ्यांनी लाईक्ससाठी नात्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवून आपल्या विकृतीचे का करतायं? असाही सवाल उपस्थित केला आहे. थोडक्यात लाईक्ससाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या हौशी रिल्सस्टार्संना नेटकऱ्यांनी कडक शब्दात फटकारले आहेत. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT