A viral social media post claimed the Modi government would seize gold from temples across India saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: मोदी सरकार देशभरातील मंदिरांमधील सोनं जप्त करणार? व्हायरल पोस्टचं सत्य काय?

Temple Gold Monetization Scheme Fact Check: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यात दावा करण्यात येत आहे की, सरकार मंदिरांमधील सोने जप्त करणार आहे. या व्हायरल दाव्याचं सत्य काय हे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • मंदिरातील सोने जप्तीबाबत सोशल मीडियावर दावा व्हायरल झाला.

  • केंद्र सरकारने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

  • मंदिर विश्वस्तांना गोल्ड बॉण्ड देण्याचा निर्णय झालेला नाही.

गेल्या काही दिवसांपासून विविध प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यातील दाव्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. व्हायरल पोस्टनुसार, केंद्र सरकार मंदिर विश्वस्तांना त्यांच्या सोन्याच्या बदल्यात गोल्ड बॉण्ड्स देणार आहे. सरकारने मंदिरांतील सुवर्णसाठ्याचे मुद्रीकरण (Monetisation) करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीय. परंतु सोशल मीडियावर पसरणाऱ्या या दाव्याचं केंद्र सरकारकडून खंडन करण्यात आले असून सर्व दावे निराधार आहेत, खोटे आहेत, असं सांगण्यात आले आहे. (Viral Claim on Temple Gold Monetization Sparks Debate Across India)

अफवांविषयी सरकारने काय म्हटलं?

सरकारने सांगितलं की, देशातील कोणत्याही मंदिर ट्रस्ट किंवा धार्मिक संस्थेकडे असलेल्या सोन्याचे मुद्रीकरण करण्याची कोणतीही योजना नाहीये. अशा सर्व आणि अफवा पूर्णपणे खोट्या दिशाभूल करणाऱ्या आणि निराधार आहेत. यासह, मंदिराच्या कळसावरील, दरवाजांवर किंवा इतर वास्तूंवर लावण्यात आलेला सोन्याचा मुलामा भारत सरकारच्या "सामरिक सुवर्ण साठा" म्हणून गणला जाईल, अशा अफवाही सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. परंतु हे सर्व दावे पूर्णपणे निराधार आहेत, खोटे आहेत.

दावे फेटाळताना सरकारनं जनतेला आवाहन केलं की, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा त्या पुढे शेअर किंवा प्रसारित करू नयेत. अशा पडताळणी न झालेल्या बातम्या आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याने अनावश्यक गोंधळ निर्माण होतो आणि लोकांची दिशाभूल होते. सरकारने जनतेला केवळ अधिकृत माध्यमांद्वारे प्रसिद्ध होणाऱ्या सरकारी माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केलंय

. धोरणात्मक निर्णय किंवा सरकारी योजनांसंबंधी कोणतीही वस्तुनिष्ठ माहिती केवळ अधिकृत प्रसिद्धीपत्रके, सरकारी संकेतस्थळे आणि प्रमाणित सार्वजनिक संवाद मंचांद्वारेच दिली जातात असं सरकारकडून सांगण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today : सोन्याचे दर आज कमी झाले की वाढले? पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K,१८K गोल्ड रेट

Navi Mumbai: मुंबई-डोंबिवलीचा प्रवास फक्त १५ मिनिटांत, ऐरोली-काटई उन्नत मार्ग या दिवशी होणार सुरू, वाचा महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: सिंहगड किल्ल्यावर दरड कोसळली

Shocking : भयंकर! पतीने फोन चेक केला; पत्नीने छातीवर बसून ओढणीने आवळला गळा, सासूने दार उघडलं अन्...

पुणेकरांची चिंता वाढली! पाऊस सुरू असूनही 'या' धरणांनी तळ गाठला; तुमच्या भागाला पाणी पुरवणाऱ्या धरणाची काय स्थिती?

SCROLL FOR NEXT