Fact Check: Viral claim of free laptop and electric cycle for students found to be false Saam Tv
व्हायरल न्यूज

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Fact Check: हा दावा ऐकल्यानंतर सगळ्यांनाच आता उत्सुकता लागली असेल की या योजनेचा लाभ मिळवायचा कसा...? कारण, केंद्र सरकारच आता विद्यार्थ्यांना फ्री इलेक्ट्रिक सायकल आणि लॅपटॉप देणार असल्याचा दावा करण्यात आलाय...5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच विद्यार्थ्यांना फ्री लॅपटॉप आणि सायकल मिळणार आहे का...?

Sandeep Chavan

हा दावा केल्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...कारण, देशभऱात 5 वी ते 12 वीचं शिक्षण घेणारे कोट्यवधी विद्यार्थी आहेत...त्यामुळे याची पडताळणी करून सत्यता समोर आणणं महत्त्वाचं आहे...पण, खरंच अशी कोणती सरकारची योजना आहे का...? ही योजना असेल तर या योजनेचा लाभ कसा मिळवायचा...? याची माहिती मिळवण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला...आणि खरंच अशी कोणती योजना आहे का...? हे जाणून घेतलं...त्यावेळी सरकारच्या अधिकृत पोर्टलवरही याबाबत माहिती मिळाली...

केंद्र सरकारची फ्री इलेक्ट्रिक सायकल योजना नाही

5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना फ्री लॅपटॉप देत नाही

कुणीही योजनांबाबत फॉर्म दिल्यास भरू नका

ऑनलाईन फॉर्मच्या माध्यमातून फसवणूक होऊ शकते

खोट्या आश्वासनांना बळी पडू नका

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा एआय निर्मित असून, सरकारची अशी कोणतीही योजना नाही...काही लोक ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून फॉर्म पाठवून फसवणूक करतायत...त्यामुळे तुमचा डेटा, तसेच बँक डिटेल्सची चोरी होऊ शकते...यापासून तुम्ही सावध राहा...आमच्या पडताळणीत केंद्र सरकारची विद्यार्थ्यांना फ्री इलेक्ट्रिक सायकल आणि लॅपटॉपची योजना असल्याचा दावा असत्य ठरलाय...ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

SCROLL FOR NEXT