An AI-generated viral clip falsely showing a tiger attacking a biker, debunked by SAM TV investigation. Saam Tv
व्हायरल न्यूज

वाघाचा बाईकस्वारावर हल्ला? शेपटीवरून बाईक नेणं पडलं महागात?

Shocking Tiger Attack Video Goes Viral: तुम्ही बिबट्याचे हल्ले पाहिले असतील...मात्र एका वाघानं धावत्या बाईकस्वारावर हल्ला चढवल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय...या बाईकस्वारानं नेमकं वाघाला काय केलं? वाघानं त्याच्यावर हल्ला का केला? काय आहे या व्हिडिओमागचं सत्य?

Sandeep Chavan

...हा व्हिडिओ पाहा...या व्हिडिओत एक वाघ रस्त्यावर झोपलेला दिसतोय...आणि काही लोक या वाघाला पाहत असल्याचं व्हिडिओतून पाहायला मिळतंय...त्याचदरम्यान बाईकस्वाराने वाघाच्या बाजूने जाण्याची हिंमत केलीय...आणि बाईकचा मागचा टायर वाघाच्या शेपटीवर पडतो आणि हा वाघ बाईकस्वारावर हल्ला करतो...हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत असून, महाराष्ट्रातील असल्याचा दावा करण्यात आलाय...

..हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...खरंच वाघाने बाईकस्वारावर हल्ला केलाय का...? वाघ हल्ला करत असताना हा व्हिडिओ कुणी बनवला...असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत...त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ नीट निरखून पाहिला...आम्हाला या व्हिडिओतील काही त्रुटी आढळून आल्यायत...

वाघाने बाईकस्वारावर हल्ला केलेला नाही

व्हायरल व्हिडिओ AI निर्मित

वाघाच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल

असे व्हिडिओ व्हायरल झाल्यास घाबरून जाऊन नका

सध्या महाराष्ट्रात वाघाचे, बिबट्यांचे हल्ले होत असल्याच्या घटना समोर आल्यायत...त्यामुळे असे एआयच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करून व्हायरल केले जातायत...त्यामुळे असा एखादा व्हिडिओ समोर आल्यास व्हायरल करू नका...आमच्या पडताळणीत वाघाने बाईकस्वारावर हल्ला केल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कायद्याच्या राज्यात धावत्या बसमध्ये दरोडे; प्रवाशांची लूटमार कधी थांबणार?

मोठी बातमी: ५०० खोक्यांवर विधान करणं काँग्रेस महिला नेत्याला भोवलं! नवज्योत कौर सिद्धूचं थेट निलंबन

IndiGo हाजिर हो! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स

खूशखबर! नवी मुंबईला मिळणार आणखी एक मेट्रो; कुठून कुठे धावणार ? जाणून घ्या

IAS Transfer: राज्यातील १३ जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या, नवं सरकार येताच बिहारमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल

SCROLL FOR NEXT