Fact Check Saam Tv (Youtube)
व्हायरल न्यूज

Fact Check : सॉफ्ट ड्रिंक्समुळे 2022 सालात 22 लाख लोक डायबिटीजचे शिकार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Fact Check : सॉफ्ट ड्रिंक्समुळे तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो. हे आम्ही म्हणत नाहीये तर तसा दावा करण्यात आलाय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Vinod Patil

Fact Check : सॉफ्ट ड्रिंक्स हे सगळेच जण पितात...मात्र, हे सॉफ्ट ड्रिंक्स तुम्हाला आजारी पाडतायत... तसा दावा करण्यात आलाय. सॉफ्ट ड्रिंक्समुळे डायबिटीज, हार्ट अ‍ॅटॅकचा धोका निर्माण होतो असा दावा केल्याने खळबळ उडालीय. मात्र, या दाव्यात किती तथ्य आहे... याची पडताळणी करणं गरजेचं आहे.. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

सॉफ्ट ड्रिंकचे सेवन अतिप्रमाणात केल्याने डायबिटिजचा धोका अधिक वाढतो. एका सर्वेक्षणात 2020 साली 22 लाख लोकांना डायबिटीज झाल्याचं समोर आलं. तसंच हार्ट अ‍ॅटॅकचाही धोका वाढतो हे स्पष्ट झालं. हा दावा धक्कादायक आहे. सॉफ्ट ड्रिंक्सने डायबिटीज होत असेल तर हे खरंच आहे का? याची सत्यता जाणून घेणं गरजेच़ आहे. कारण 180 देशात सर्वे करण्यात आला. त्यात हे आढळून आलंय. सॉफ्ट ड्रिंक्स हे लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच पितात. त्यामुळे या दाव्यात तथ्य आहे का हे जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने तज्ज्ञांची भेट घेतली आणि याबाबत अधिक माहिती जाणून घेतली.

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

- सॉफ्ट ड्रिंक्समधील आर्टिफिशियल शुगर, सामान्य साखरेपेक्षा जास्त हानिकारक असते.

- सॉफ्ट ड्रिंक्समध्ये असलेल्या कॅफीनमुळे रक्तदाब वाढू शकतो.

- सॉफ्ट ड्रिंक्समुळे वजन वाढते आणि डायबिटिजचा धोका वाढतो.

- सॉफ्ट ड्रिंक्सचं सेवन करणार्‍यांना हार्ट अ‍ॅटॅकही येऊ शकतो.

सॉफ्ट ड्रिंक्सचं सेवन अतिप्रमाणात करू नये. जास्तप्रमाणात सॉफ्ट ड्रिंक्स प्यायल्याने शरीरावर गंभीर परिणाम होतात. हे नेचर मेडिसिनच्या सर्व्हेत समोर आलय. त्यामुळे आमच्या पडताळणीत सॉफ्ट ड्रिंक्समुळे डायबिटीस, हार्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढतो हा दावा सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Photo Removal Case: मनसेच्या नेत्याला मुंबईतून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Nepal Flood: महापुरात घरं वाहून नेली, पण निष्ठा नाही! मालकाच्या प्रतीक्षेत कुत्रे ढिगाऱ्याजवळ ठाण मांडून

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसणार? 6 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

जमिनीसाठी आई-बापाच्या जीवावर उठले, निर्लज्ज मुलांची आई-वडिलांना भररस्त्यात मारहाण

Pomegranate Vs Dragon Fruit : डाळिंब vs ड्रॅगन फ्रूट ? कोणतं फळ खाल्ल्याने मिळतं जास्त पोषण

SCROLL FOR NEXT