आधारकार्डवर 3 लाखांचं लोन मिळणार असा मेसेज व्हायरल केला जातो...आधारकार्ड सगळ्यांकडेच असतं...त्यामुळे अनेकजणांनी यावर विश्वास ठेवलाय...पण, खरंच आता पीएम लोन स्कीम अशी सरकारची योजना आहे का...? आधारकार्डवर लोन देणं शक्य आहे का...? लोन मिळणार असेल तर त्यासाठी काय कागदपत्र लागतात...? असे अनेक सवाल उपस्थित होतायत...त्यामुळे आम्ही या मेसेजची पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...
व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटलंय?
आधार कार्ड असल्यास 3 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकतं.सरकारची कर्ज देणारी 'पीएम लोन स्कीम' योजना आलीय.
हा मेसेज व्हायरल होतोय...पैशांचा विषय असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...याबाबत खरी माहिती सरकारकडूनच मिळू शकते...त्यामुळे आम्ही सरकारची वेबसाईट पाहिली...अशी योजना आहे का ते जाणून घेतलं...तसंच काही अधिकाऱ्यांशीही याबाबत चर्चा केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
व्हायरल सत्य
साम इन्व्हिस्टिगेशन
आधार कार्डवर 3 लाख कर्ज मिळतं हा दावा खोटा
केंद्र सरकारची पीएम लोन स्कीम नाही
अशी कोणतीही योजना अस्तित्वात नाही
कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका
पैशांचं आमिष दाखवून फसवणुकीचा प्रयत्न
या मेसेजसोबत लिंकही पाठवली जाते...पंतप्रधानांचा फोटो असतो...त्यामुळे अनेकांना हे खरं वाटतं...पण, लिंकच्या आधारे तुमची माहिती घेतली जाते...आणि इथेच आपली फसवणूक होते...लोन मिळत नाही, मात्र आपलंच खातं रिकामी होऊ शकतं...त्यामुळे अशा कोणत्याही व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका...आमच्या पडताळणीत आधारकार्डवर 3 लाख रुपये मिळतात हा दावा असत्य ठरलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.