Dancer Gautami Patil clarifies she has no plans to enter politics amid viral election rumours. Saam Tv
व्हायरल न्यूज

गौतमी पाटील निवडणूक लढवणार? गौतमी पाटील होणार नगरसेविका?

Fact Check: गौतमी पाटील आता निवडणूक लढवणार आहे...होय, आता गौतमी पाटील राजकारणात उतरणार असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच गौतमी पाटील डान्स सोडून राजकारणात उतरणार आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...

Sandeep Chavan

होय, आता गौतमी नगरसेविका होऊन लोकांची सेवा करणार असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच गौतमी आता राजकारणात उतरणार आहे का...? गौतमीने डान्स सोडून आता राजकारणात प्रवेश करणार आहे का...?

असे अनेक प्रश्न गौतमीचे चाहते विचारतायत...त्यामुळे आम्हीही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

नृत्यांगणा गौतमी पाटील आता निवडणुकीत उतरणार आहे. नगरसेविका होऊन गौतमी जनतेची सेवा करणाराय. हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला...याबाबत खरी माहिती ही गौतमीच देऊ शकते...त्यामुळे आमच्या टीमने पडताळणी सुरू केली...कारण, मुंबई, पुण्यासह 29 ठिकाणी निवडणुका आहेत...त्यामुळे गौतमी कुठून निवडणूक लढणार आहे...? खरंच गौतमी आता निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे का...? याची माहिती मिळवण्यासाठी आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव यांनी थेट गौतमीची भेट घेतली...आणि गौतमी निवडणूक लढवणार आहे का...? हे जाणून घेतलं...

गौतमी पाटील निवडणूक लढणार नाही

राजकारणात इंटरेस्ट नसल्याचं गौतमीनं सांगितलं

फक्त अॅक्टिंग, डान्स, कला सादर करणार

गौतमी पाटील ही कलाकार आहे...आणि ती कला सादर करून मनोरंजन करतेय...स्वत:च गौतमीने आपण निवडणूक लढणार नसल्याचं सांगितलंय...

त्यामुळे पालिका निवडणुकीत गौतमी पाटील निवडणूक लढणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: मुंबई महापालिकेतील महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला, शिंदेसेना ९० जागा तर भाजपला १३७ जागा

Congress-Vanchit Alliance: काँग्रेस वंचित युती, वर्षा गायकवाड नाराज? गायकवाडांनी नाराजीनाट्यावर सोडलं मौन

Pune Corporation Election: पुण्यात काँग्रेसच्या हातात मशाल; काँग्रेस-ठाकरे सेनेचं जागावाटप जाहीर

मुंबईत भीषण अपघाताचा थरार; भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडले, ४ जणांचा मृत्यू

दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं, भाजपला दूर सारत राष्ट्रवादी एकत्र

SCROLL FOR NEXT