viral social media post linking Deepika Padukone to Sonam Wangchuk's protest saam tv
व्हायरल न्यूज

सोनम वांगचुंक यांच्या उपोषणाला दीपिकाचं समर्थन? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Fact Check Deepika Padukone Support Sonam Wangchuk: व्हायरल मेसेजमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण यांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय. सरकारवर टीका केली, असा दावा करण्यात आला आहे.

Sandeep Chavan

  • दीपिका पादुकोण यांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय.

  • या दाव्यात दीपिकाने सरकारवर टीका केल्याचाही उल्लेख

  • व्हायरल मेसेजची सखोल पडताळणी करून त्यामागील सत्य शोधण्याचा प्रयत्न

आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. अभिनेत्री दीपिका पादुकोणनं सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला समर्थन दिल्याचा दावा करण्यात आलाय. यावेळी तिने सरकारवरही निशाणा साधल्याचा दावा करण्यात आलाय. पण, खरंच दीपिकाने इंन्स्टावर पोस्ट केलीय का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल मेसेज

तो उपवास करत आहे. आम्ही फक्त स्क्रोल करत आहोत.याबद्दल कोणीच का बोलत नाहीये? आपण लोकशाहीच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहोत. दीपिकाच्या कथित व्हायरल इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ही पोस्ट लिहिण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. दीपिकाने सध्याच्या परिस्थितीवर दुःख व्यक्त केलंय..पण, खरंच दीपिकाने इन्स्टाग्राम पोस्ट करून सोनम वांगचुंक यांना पाठिंबा दर्शवलाय का? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही दीपिकाने इन्स्टावर पोस्ट शेअर केलीय का? हे तपासून पाहिलं. मात्र, आम्हाला कुठेही अशी पोस्ट दिसली नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य - साम इन्व्हिस्टिगेशन

दीपिका पदुकोणच्या नावाने व्हायरल पोस्ट बनावट

दीपिकाने वांगचुक यांच्या समर्थनार्थ पोस्ट केलेली नाही

दीपिकाच्या व्हेरिफाईड अकाउंटवर कोणतीही पोस्ट नाही

बनावट पोस्ट डिजिटल पद्धतीने एडिट करून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जातेय. दीपिकाने ही पोस्ट केली आणि नंतर डिलीट केली, असाही काहींनी दावा केला.अनेक बडे कलाकार नीट पेपरफुटी आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर गप्प राहिले आहेत. असं असलं तरी अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबाही दर्शवलाय. यामध्ये अनुराग कश्यप, नसीरुद्दीन शाह यांच्यापासून विशाल दादलानी, अतुल कुलकर्णी यांच्यापर्यंतच्या नावांचा समावेश आहे. मात्र, अभिनेत्री दीपिकाने वांगचुंक यांच्या उपोषणाला समर्थन दिल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खोत डोंगरी पुनर्विकास प्रकल्पाचा वाद पेटला; न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवला, ऑफिस कंटेनर हटवला

सलमान खानचा SRA मध्ये जलवा! झोपडपट्टीधारकांना मिळालं हक्काचं घर

जयंत पाटलांना अर्थखातं मिळणार? फडणवीस-शिंदेंसोबत जयंत पाटलांची बैठक

Warkari Accident: वारकऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात; सातारा-पुसेगाव रस्त्यावर दोन वाहनांची समोरासमोर धडक

Sir Garfield Sobers : क्रिकेट विश्वावर शोककळा; महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांचं निधन

SCROLL FOR NEXT