Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: गावाकडच्या खेळांची मजा न्यारी! झाड, दोरीच्या जीवावर बनवला भन्नाट झोका; VIDEO एकदा पाहाच

Children Viral Vieo: जत्रा म्हटल्यावर चमचमणारी दुकानं, रंगीबेरंगी झुले, आकाशपाळणे, चविष्ट खाद्यपदार्थ आणि आनंदी लोकांची गर्दी डोळ्यासमोर उभी राहते, जिथे प्रत्येक जण उत्साहात आनंद लुटत असतो.

Dhanshri Shintre

जत्रेचा विचार करताच मनात उत्साह भरतो. दुकानं, झुले, आकाशपाळणे, स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि आनंदी लोकांची गर्दी. विशेषतः लहान मुलांसाठी जत्रेतील झोके आणि आकाशपाळणे हे सर्वात मोठं आकर्षण असतं. त्यांना झोक्यांचे अप्रतिम वेड असते, म्हणूनच घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे झोके दिसतात. काहींनी स्विंग लावलेले असतात, काहींना कापडी पाळण्याची आवड असते, काही झाडाच्या फांदीला झोका लावतात, तर काही टायर किंवा लाकडी फळीला दोरी लावून झुलतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक अनोखा झोका चर्चेचा विषय ठरत आहे. या हटके झोक्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून, लोक मोठ्या उत्सुकतेने त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

काहींनी स्विंग लावलेले असतात, काहींना कापडी पाळण्याची आवड असते, काही झाडाच्या फांदीला झोका लावतात, तर काही टायर किंवा लाकडी फळीला दोरी लावून झुलतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक अनोखा झोका चर्चेचा विषय ठरत आहे. या हटके झोक्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून, लोक मोठ्या उत्सुकतेने त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ गावाकडील असल्याचे दिसते. व्हिडिओमध्ये काही चिमुकल्यांना आकाशपाळण्याचा आनंद घ्यायचा असून, त्यांनी त्यासाठी अनोखा जुगाड केला आहे. नाल्यालगत असलेल्या झाडाला दोऱ्या बांधल्या असून, त्याच्या मदतीने मुलं हटके झोका घेत आहेत. ही मुलं धावत कठड्यावर जातात, हवेत झुलतात आणि पुन्हा कठड्यावर परत येतात. हा अनोखा आकाशपाळणा पाहून नेटकरीही आश्चर्यचकित झाले आहेत. या मुलांनी डोकं लावून तयार केलेला हा झोका तुम्हालाही नक्कीच पाहावासा वाटेल.

गावी गेल्यावर तुम्हीही वडाच्या झाडाच्या पारंब्यावर झोका घेतला असेल. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओतही अशीच मजा पाहायला मिळते. या चिमुकल्यांनी दोरीच्या मदतीने अनोखा आकाशपाळणा तयार केला आहे, ज्यावर ते गोल फिरत झोका घेत आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक जण तोल सांभाळत, सुरक्षितपणे खेळाचा आनंद घेत आहे. त्यांचा तालबद्ध समन्वय पाहण्यासारखा आहे. या मुलांचा कल्पक खेळ पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. त्यांच्या हटके जुगाडाने सोशल मीडियावर उत्सुकता निर्माण केली आहे.

'@kamalsingh_92' या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी ते पाहून आपल्या बालपणीच्या आठवणीत रमले आहेत. तू मला माझ्या लहानपणीची आठवण करून दिलीस, झाडे का वाढवावी याचे आणखी एक सुंदर उदाहरण, हा खरा खेळ आणि हेच खरे खेळाडू, अशा कमेंट्सने व्हिडीओ गाजत आहे. काहींनी सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत स्वतःची काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. हा अनोखा जुगाड नेटकऱ्यांच्या मनाला भावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT