CCTV Footage Saam Digital
व्हायरल न्यूज

Accident CCTV : भरधाव बसच्या चाकाखाली स्कुटी सापडली, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, अपघाताचा VIDEO

Bengaluru Viral Video: बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २१ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीला बसने धडक दिल्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bengaluru Accident News

बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २१ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीला बसने धडक दिल्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला आहे. आता या खरारक अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळूरच्या मल्लेश्वर येथील हरिश्चंद्रघाटाजवळ(ता.३)शनिवार रोजी संपूर्ण घटना घडलीये. कुसुमिथा असे २१ वर्षीय मृत तरुणीचे नाव असून इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकत होती. शनिवारी सकाळी ८.३० च्या सुमारास कुसुमिथा घरातून कॉलेजकजे जात असताना दुर्देवी घटना घडली आहे. एका बसमधील सीसीटीव्हीमध्ये काही घटना कैद झाली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, अपघाताच्या मार्गावरुन एक बसमध्ये जात आहे. बसमध्ये काही प्रवाशी बसलेले आहेत. सुरुवातील सर्वकाही योग्य प्रकारे सुरु आहे. बसच्या पहिल्या सीटवर बसलेल्या महिलेच्या बाजूच्या खिडकी आहे त्यामध्ये संपूर्ण घटना आपल्याला दिसते. काही वेळानंतरच रस्त्यावरुन कुसुमिथा स्कुटीवरुन जात असते परंतू क्षणात होत्याच नव्हतं झालं. बघता बघता कुसुमिथाला बसचा धक्का लागतो आणि तिचा बसच्या खाली आल्याने जागीच मृत्यू होतो.

संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील@HateDetectorsया अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु करण्यात आलाय तसेच याआधीही बसखाली येऊन अनेक व्यक्तीचे नाहत बळी गेले आहेत तसेच त्यासंबंधीत अनेक सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

Government Job: १०वी, १२ वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये १५० पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT