Elephant Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Elephant Viral Video: हत्तीने खाल्ली पाणीपुरी; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकित

Elephant Eating Panipuri: मालक पाणीपुरी खात असल्याचं पाहून हत्तीला देखील पाणीपुरी खाण्याची इच्छा होते. त्यामुळे पाणीपुरीवाला त्याला एक पाणीपुरी बनवून देतो. मग काय हत्तीला पाणीपुरी इतकी आवडते की तो तेथून जाण्याचं नाव घेत नाही.

Ruchika Jadhav

Elephant Viral Video:

पाणीपुरी म्हणजे प्रत्येक मुलीची सर्वात जास्त आवडती डिश. रस्त्यावर थंडगार पाणीपुरी खायला सर्वांनाच आवडतं. आता पणीपुरीची चटक एका हत्तीला देखील लागली आहे. हत्ती पाणीपुरी खात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आलाय. हत्तीची ही करामत नेटकऱ्यांना फार आवडली आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका पाणीपुरीच्या दुकानाबाहेर एक व्यक्ती हत्ती घेऊन आलाय. आधी तो व्यक्ती पाणीपुरी खातो. मालक पाणीपुरी खात असल्याचं पाहून हत्तीला देखील पाणीपुरी खाण्याची इच्छा होते. त्यामुळे पाणीपुरीवाला त्याला एक पाणीपुरी बनवून देतो. मग काय हत्तीला पाणीपुरी इतकी आवडते की तो तेथून जाण्याचं नाव घेत नाही.

पाणीपुरी बनवणारा व्यक्ती त्याला पाणीपुरी भरवून दमून जातो. भररस्त्यात हत्ती पाणीपुरी खातोय हे समजताच अनेक नागरिकांनी तेथे गर्दी केली आहे. सोशल मीडियावर @visamya8 या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. आतापर्यंत व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्युव्ज आणि लाइक्स मिळाले आहेत.

हा व्हिडिओ पाहून अनेकांनी यावर हास्यास्पद कमेंट केल्यात. पाणीपुरी जास्तकरून मुलींची फेवरेट असते. त्यामुळे एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, ही फिमेल हत्ती असेल. तर आणखी एकाने हत्तीला जास्त तिखट पाणी देऊ नका असंही कमेंटमध्ये लिहिलं आहे.

सोशल मीडियावर मुक्या जनावरांना असं काहीतरी अतरंगी खाऊ घालतानाचे अनेक व्हिडिओ समोर आलेत. या आधी काही व्यक्तींनी सापाला आणि माकडाला खट्याळपणा करून दारू पाजली होती. सदर घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. अशा व्यक्ती विरोधात कारवाई केली पाहिजे अशी मागणी सर्प मित्रांनी व्हिडिओ पाहून केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी मुख्यमंत्र्यांच्या चालकाला शिवीगाळ अन् मारहाण; पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा

Maharashtra News Live Update: अन्न व औषध प्रशासनाकडून आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाई

Latest Alta Design For Feet: पायांचे सौंदर्य खुलवण्यासाठी ट्राय करा अल्ताचे हे ७ लेटेस्ट डिझाइन्स

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तिहेरी अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

Mumabi Tourism : गर्दी नाही, गोंधळ नाही; 'येथे' लपलाय अथांग समुद्रकिनारा, जणू मुंबईतला स्वर्गच

SCROLL FOR NEXT