Mumbai Local train Viral Video Saam tv
व्हायरल न्यूज

Mumbai Local Train Viral Video: धावत्या लोकल ट्रेनमध्ये सलमानचा हटके डान्स, प्रवाशांनी दिली मनापासून दाद, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Local train Viral Video: सलमान सारखा दिसणाऱ्या तरुणाचा नाचतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

Mumbai local train Viral News: मुंबईकरांची लाईफलाईन म्हणजे लोकल ट्रेन. बहुतांश मुंबईकर कामासाठी लोकल ट्रेनने प्रवास करतात. या लोकल ट्रेनमध्ये अनेक धम्माल किस्से देखील घडत असतात. काही दिवसांआधी ट्रेनमध्ये एका तरुणीचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता सलमान सारखा दिसणाऱ्या तरुणाचा नाचतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. (Latest Marathi News)

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये अनेकवेळी प्रवाशांना बसायला जागा नसली तरी ही लाईफलाईन सर्वांनाच हवीहवीशी आहे. मुंबई लोकल ट्रेनमधील गाणे गाणाऱ्यांचे आणि तरुण-तरुणांचे नाचतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हायरल व्हिडिओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत असते. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे.

डान्स प्रवाशांनी केला कॅमेरात केला कैद

या व्हिडिओत दिसत आहे की, सलमान सारख्या दिसणाऱ्या तरुणाने चक्क धावत्या लोकल ट्रेनमध्ये हटके डान्स केला आहे. अनेक प्रवाशांनी त्याच्या डान्सला प्रवाशांनी मनापासून दाद देताना दिसत आहे.

अनेक प्रवासी या तरुणाचा डान्स करतानाचा क्षण कॅमेरात कैद करताना दिसत आहे. या तरुणाचा डान्स पाहताना प्रवाशांच्या चेहऱ्या हसू उमटत होतं. तरुणाच्या डान्सने साऱ्याचं लक्ष वेधून घेतलं. या तरुणाचा डान्स पाहून कामावरून सुटलेल्या कर्मचाऱ्यांचा थकवाच गेल्याचे दिसून येत आहे.

धावत्या लोकल ट्रेनमध्ये सलमानचा डान्स

धावत्या लोकल ट्रेनमध्ये सलमान सारख्या दिसणाऱ्या तरुणाचं नाव झोएब सय्यद आहे. झोएब सय्यद हा कलाकार आहे. झोएबचा इन्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग आहे. झोएबने अनेक कार्यक्रमात सलमान खानची (Salman Khan) भूमिका साकारली आहे. सलमान खान सारखा दिसणाऱ्या झोएबला अनेक जण कार्यक्रमासाठी आमंत्रित करतात.

झोएब अनेकदा सलमानचे डायलॉग बोलून लोकांना खूश करत असतो. झोएब कपडेही सलमान खान सारखेच घालताना दिसतो. झोएब हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. झोएब सलमानच्या गाण्यावरील रील्स आणि सलमान स्टाईलमधील फोटो त्याच्या चाहत्यांना शेअर करत असतो. त्याच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटसचा वर्षाव होतो.

तरुणीचा व्हिडिओ झाला होता व्हायरल

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ट्रेनमध्ये नाचणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. लोकल ट्रेनमध्ये तरुणी थेट सीटवर बसली होती. अचानक ही तरुणी सीटवर बसूनच नाचू लागली होती. तिचा डान्स पाहून आजूबाजूचे प्रवासी चकीत झाले होते. सीटवर बसलेल्या सर्वांचं लक्ष तिच्याकडे गेले होतं. मात्र, तरुणी मात्र प्रवाशांना न लाजता नाचत होती . सीमा कनोजिया असं या तरुणीचं नाव आहे. या तरुणीचा व्हिडिओ देखील अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Mama: 'अशोक मा.मा.' मालिकेत वर्षा उसगांवकर यांची धमाकेदार एन्ट्री; रंगणार मंगळागौरीचा महाखेळ, पाहा VIDEO

Vaishnavi Hagawane: वैष्णवी हगवणेची आत्महत्या नव्हे हत्याच, समितीचा धक्कादायक अहवाल समोर

Diva Station Platform : पाठलाग करत मागे आला, अन् अचानक महिलेला मालगाडीखाली ढकललं, पहाटे दिवा स्टेशनवर थरारक घटना

Ind vs Pak Match Cancel: भारत-पाकिस्तान सामना रद्द; आयोजकांकडून अधिकृत घोषणा, काय सांगितलं कारण?

Maharashtra Live News Update: भिमाशंकर अभारण्यातील पर्यटनस्थळांवर बंदी

SCROLL FOR NEXT