CCTV VIDEO Saam TV
व्हायरल न्यूज

CCTV VIDEO: 31 डिसेंबरच्या रात्री तरुणी तराट; सोसायटीत धिंगाणा, तोडफोड करत घातला राडा

Drunken Young Woman High Voltage Drama: नशेच्या अमलाखाली असलेल्या तरुणीनं सोसायटीचं गेट बंद करून नागरिकांना उपद्रव केला. सोसायटीतील रहिवाशांनी पोलिसांना बोलावल्यानंतर तिनं महिला पोलीस कर्मचाऱ्यांना

Ruchika Jadhav

Pune News:

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरला सर्वत्र जल्लोष पाहायला मिळाला. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षीचं स्वागत करतता. अनेक व्यक्ती मद्य पिऊन आपला आनंद साजरा करतात. अशात पुण्यात ३१ डिसेंबरच्या रात्री एका तरुणीने मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला आहे. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुण्यामध्ये एका मद्यधुंद तरुणीनं चांगलाच राडा घातला. वानवडीतील ऑक्सफर्ड कंफोर्ट सोसायटीत 31 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली. नशेच्या अमलाखाली असलेल्या तरुणीनं सोसायटीचं गेट बंद करून नागरिकांना उपद्रव केला. सोसायटीतील रहिवाशांनी पोलिसांना बोलावल्यानंतर तिनं महिला पोलीस कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केली.

तसंच सोसायटीच्या मालमत्तेची तोडफोड केली, असं रहिवाशांचं म्हणणं आहे. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत तिला ताब्यात घेतलं. संबंधित तरुणी एका बड्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्यानं तिला लगेच सोडून देण्यात आलं, असं सोसायटीतील रहिवाशांचं म्हणणं आहे.

थर्टीफस्टच्या रात्री अनेक तळीराम रस्त्यावर धिंगाणे घालतात. तरुणाई किंवा अन्य व्यक्ती देखील मद्यधुंद अवस्थेत असतात. त्यांच्यामुळे सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊनये यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री पोलिसांनी मुंबईसह उपनगरांत रात्री पाहारा दिला होता. मात्र तरिही पुण्यातील एका हायक्लास सोसायटीमध्ये मद्यधुंद तरुणीने राडा घातल्याची घटना घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

SCROLL FOR NEXT